पुण्यातील उरळीकांचन येथे भरदिवसा गोळीबार; जुन्या वादातून टोळी युद्ध

Update: 2021-10-22 14:29 GMT

जुन्या वादातून पुण्यातील उरळीकांचन याठिकाणी भरदिवसा गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात संतोष जगताप व इतर तीन जण गंभीर जखमी आहेत. लोणीकाळभोर परिसरातील उरूळी कांचन येथील तळवेडे चौकात ही घटना आज दुपारी घडली. या गोळीबाराच्या घटनेमध्ये जखमी झालेल्यांवर विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यामधील दोघांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे.अप्पा लोंढे टोळी आणि त्याच्या विरूध्द असलेल्या एका टोळीमध्ये हा गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे.संतोष जगताप याच्यावर देखील गोळीबार झाला असून त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे. गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली असून वाळूची ठेकेदारी आणि इतर वादातून हे टोळी युध्द झाल्याची चर्चा सुरु आहे. भरदिवसा पुण्यातील लोणीकाळभोर परिसरात ही घटना घडल्याने प्रचंड खळबळ उडाली असून पूर्वीच्या वादातून हा गोळीबार झाला असल्याचे समजते. याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

Tags:    

Similar News