केंद्र सरकारने केलेले तीनही कायदे रद्द करा :बहुजन समाज पार्टीची मागणी

Update: 2021-09-27 11:04 GMT

वर्धा : केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या 'भारत बंद'ला वर्ध्यात बहुजन समाज पार्टीने पाठिंबा दिला आहे.बहुजन समाज पार्टीचे अध्यक्ष मोहन राईकवार या बंदला जाहीर पाठिंबा असल्याचं म्हणत म्हटले की, देशभरातील 100 पेक्षा जास्त संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे. सकाळी 10 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत हा बंद चालणार आहे. या बंदला आमचा पाठिंबा असून आम्ही बंदमध्ये सहभागी आहोत असं त्यांनी सांगितलं

गेल्या 10 महीन्यांपासून दिल्लीत शेतकरी आंदोलन करत असून वर्ध्यात सुद्धा त्याचे समर्थन आणि तीन काळे कायदे रद्द करण्याचा मागणीसाठी आंदोलन सुरू आहे, दिल्लीत आंदोलनादरम्यान अनेक शेतकरी मृत्युमुखी पडले तरी केंद्र सरकारला जाग आली नाही , सरकारला जागे करण्यासाठी आजचा बंद पुकारण्यात आला असून त्याला समर्थन असल्याचं राईकवार यांनी सांगितले.

दरम्यान यावेळी वर्ध्यात बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. केंद्र सरकारने आम्हाला नको असलेले काळे कायदे तातडीने मागे घ्यावेत, हे कायदे बळजबरीने आमच्यावर लादण्यात आले आहे आहेत असं आंदोलकांनी यावेळी म्हटले आहे.

Tags:    

Similar News