देशात मोबाईल सेवा देणाऱ्या कंपन्यांमध्ये सगळ्यात पुढे असलेल्या Reliance Jio चे नेटवर्ड डाऊन झाल्याचे समोर आले आहे. Jioच्या मुंबई सर्कलमध्ये अनेकांनी आपले नेटवर्क गेल्याची तक्रार केली आहे. अनेकांच्या मोबाईलमद्ये जिओचे नेटवर्क येत नसल्याच्या तक्रारी कऱण्यात येत आहेत. त्यामुळे वापरकर्त्यांना फोन करता येत नाहीयेत. ट्विटवर अनेक जिओ वापरकर्त्यांनी जिओच्या नंबरवरुन फोन करता येत नसल्याचे सांगितले आहे. एवढेच नाहीतर इतर कंपन्यांच्या फोन नंबरवरुन देखील जिओ नंबरवर फोन लागत नसल्याच्या तक्रारी काही जणांनी केल्या आहेत. जिओतर्फे सध्या तरी याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. जिओच्या मुंबई सर्कल व्यतिरिक्त आणखी कुठे असा प्रकार झाला आहे का याची माहिती मिळू शकलेली नाही.
मुंबईसह, ठाणे परिसरातही Jioची मोबाईल आणि इंटरनेट सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास अनेकांनी मोबाईलचे नेटवर्क गेल्याची तक्रार करण्यास सुरूवात केली. जिओचे नेटवर्क ठप्प का झाले याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. Reliance jio कडून यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती दिली गेलेली नाही. दरम्यान मोबाईल धारकांना आता दुसऱ्या कंपनीच्या नंबरवर आणि नेटवर्कवर अवलंबून रहावे लागत आहे.