Manikrao Kokate यांना २ वर्षांची शिक्षा, ही हिट विकेट, योग्यवेळी केस बाहेर - संजय राऊत
Manikrao Kokate Government Flat Scam Case बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिकेचा लाभ घेण्याप्रकरणी माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूना कनिष्ठ न्यायालयानं सुनावलेली दोन वर्षांची शिक्षा Nashik District Sessions कोर्ट नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं कायम ठेवली आहे. तसेच त्यांच्याविरोधात न्यायालयानं अटक वॉरंटही जारी केलं आहे. महाराष्ट्र सरकारमधील कॅबिनेट मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून मंत्रिपद काढून घेण्यात आलं आहे. त्यांच्याकडे क्रीडा व युवक कल्याण तसेच अल्पसंख्यांक मंत्रालयाची धुरा होती. माणिकराव कोकाटे हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे नेते आहेत.
दरम्यान न्यायालयाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाने माणिकराव कोकाटे यांच्याकडील खाते अजित पवारांकडे देण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला होता. यावर महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे माणिकराव कोकाटे यांच्याकडील सर्व खाती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवण्याची विनंती मान्य केल्याचे पत्राद्वारे कळवले आहे.
काय आहे शासकीय सदनिका घोटाळा ?
तत्कालीन आमदार, खासदार यांच्या कोट्यातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी देण्यात येणार्या सदनिका मिळवताना कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप माणिकराव कोकाटेंवर होता. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी 1995 मध्ये माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात सदनिकांच्या घोटाळ्यांसंदर्भात दावा दाखल केला होता. 1997 मध्ये तत्कालीन उपजिल्हाधिकाऱ्यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात माणिकराव कोकाटे व त्यांचे भाऊ बंधू सुनील कोकाटे हे आरोपी नंबर 1 व 2 होते आणि 3 व 4 नंबरचे आरोपी हे कोकाटे यांचे नातेवाईक होते. त्यांनी मिळवलेल्या सदनिका नंतर कोकाटे यांनी स्वतःच्या नावावर करुन घेतल्या. कोकाटे यांनी सदनिका मिळवताना आपण स्वतः आर्थिक दुर्लभ घटकातून येत असल्याचं दाखवलं होतं.
त्याच वेळी कोकाटे यांचे वडील कोपरगाव साखर कारखण्यात संचालक होते व जानकारांनुसार ते 100 -200 टन उस कारखान्यात पाठवत होते. शहराच्या मध्यभागातील बॉईज टाऊन शाळेजवळील एका इमारतीमधील सदनिका माणिकराव कोकाटे यांनी बनावट कागदपत्रे सादर करुन मिळवल्या होत्या आणि नंतर इतर दोघांच्या सदनिका स्वतःकडे घेत बेकायदेशीर बांधकाम व अतिक्रमण केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला गेला होता.
ह्याच सदनिकांच्या तळ मजल्यावर वाढीव काम करत कोकाटे यांनी सिन्नर तालुका विभाग दूध प्रक्रिया संघाचे 24 तास मिल्क एटीएम सुरू केले होते पण सध्या बंद स्थितीत आहे.
दरम्यान माणिकराव कोकाटे यांच्याकडे यापूर्वी कृषी खाते होते परंतु विधी मंडळात मोबाईवर पत्ते खेळतानाचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यांच्याकडून कृषी खातं काढून घेण्यात आलं. त्यानंतर त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्याच्या क्रीडा व युवक कल्याण तसेच अल्पसंख्यांक मंत्रालयाचा कार्यभार सोपवण्यात आला.
एकंदरित वादग्रस्त कारकीर्द असलेल्या माणिकराव कोकाटेंना सरकार वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. तसेच सत्ताधारी आणि विरोधकांवर सोयीनुसार कारवाई केली जात असल्याचही विरोधक म्हणत आहे. कारण राहुल गांधी व सुनील केदार यांना शिक्षा होताच 24 तासांत त्यांची खासदारकी व आमदारकी रद्द केली होती, पण माणिकराव कोकाटेंना मात्र सरकार वाचवत आहे असं विरोधकंकडून म्हटलं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. आमदार रोहित पवार सोशल मीडिया एक्सवर लिहितात की,
माणिकराव कोकाटेंना शिक्षा झाल्यानंतरही कायद्याचा गाढा अभ्यास असणारे विधानसभा अध्यक्ष कोकाटेंची आमदारकी रद्द का करत नाहीत? कायद्यानुसार लोकसभेत राहुल गांधींची आणि महाराष्ट्रात सुनिल केदार यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. मग कोकाटेंना वेगळा न्याय का? की कोकाटे कायद्यापेक्षा…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 17, 2025
तर शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत यांनी आपल्या पत्रकार परिषदेत म्हटलं की, कोकाटे ही हिट विकेट आहे. त्यांनी स्वतः खड्ड्यात उडी मारली आहे. ती केस आत्ताची नाही. मात्र, ती योग्य वेळी बाहेर आली आणि ती कसब देवेंद्र फडणवीसांमध्ये नक्कीच आहे. असे त्यांनी म्हटले आहे.