Income Tax कॉलेक्टिव : सरकारी तिजोरीत १७ लाख कोटी जमा, पण कर सवलतीमुळे वाढीचा वेग मंदावला
Income Tax Collection: ₹17 lakh crore collected in the government treasury, but the pace of growth has slowed down due to tax exemptions.
चालू आर्थिक वर्षात (एप्रिल ते १७ डिसेंबर २०२५) केंद्र सरकारचे थेट कर संकलन (Direct Tax Collection) परतावा (Refunds) वजा करून १७ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत यात ८ टक्क्यांची वाढ झाली आहे.सरकारने पूर्ण वर्षासाठी २५.२ लाख कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले आहे. आतापर्यंत या उद्दिष्टाच्या सुमारे दोन-तृतीयांश भाग पूर्ण झाला आहे.
बजेटमध्ये १३% वाढीचा अंदाज वर्तवण्यात आला होता, परंतु प्रत्यक्ष वाढ ८% इतकीच झाली आहे. वैयक्तिक आयकर दरात देण्यात आलेल्या सवलतीमुळे (Tax Rate Relief) महसूल वाढीचा वेग काहीसा कमी झाला आहे. कंपन्यांनी या कालावधीत ८.१७ लाख कोटी रुपयांचा कर भरला आहे. यामध्ये १०.५ टक्क्यांची वाढ झाली असून, ही वाढ १ फेब्रुवारीच्या अर्थसंकल्पात वर्तवलेल्या अंदाजाच्या बरोबरीने आहे.
वाढ कमी का झाली ?
केंद्र सरकारने वैयक्तिक प्राप्तिकर (Personal Income Tax) भरणाऱ्यांना कर दरांमध्ये सवलत दिली होती. यामुळे नागरिकांच्या हातात जास्त पैसे उरले असले तरी, सरकारच्या तिजोरीत जमा होणाऱ्या कर महसुलाची गती अपेक्षेपेक्षा थोडी कमी राहिली आहे.