मेट्रो सिटीमध्ये राहूनही करोडपती होणं शक्य ! ५३,००० रुपयांच्या शिस्तबद्ध गुंतवणुकीने बदला नशीब

Financial Planning Build a 1.24 Crore Fund in 10 Years with This Formula

Update: 2026-01-08 12:05 GMT

मेट्रो शहरांमध्ये राहणाऱ्या जोडप्यांसाठी (Couples) घरभाडे, ईएमआय, मुलांचे शिक्षण आणि महागाई या खर्चातून वाचून मोठी संपत्ती जमा करणे हे अनेकदा दिवास्वप्न वाटते. पती-पत्नी दोघांचे मिळून मासिक उत्पन्न १.५० लाख रुपये असले तरी, महिन्याच्या शेवटी हातात फारसे पैसे उरत नाहीत, अशी अनेकांची तक्रार असते. मात्र, योग्य आर्थिक नियोजनाने हे चित्र बदलू शकते.

प्रसिद्ध सी.डब्ल्यू.एम. (CWM) विजय माहेश्वरी यांनी नुकतेच एका लिंकडइन पोस्टद्वारे एक जबरदस्त 'गुंतवणूक ब्ल्यूप्रिंट' शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी १.५ लाख उत्पन्न असलेल्या जोडप्याला केवळ १० वर्षांत १.२४ कोटी रुपयांचा फंड (Corpus) कसा उभा करता येईल, याचे गणित मांडले आहे.

खर्चाचे गणित आणि बचतीचा मार्ग माहेश्वरी यांच्या मते, जर एखाद्या जोडप्याचे एकत्रित उत्पन्न १,५०,००० रुपये असेल, तर त्यांचे निश्चित खर्च (Fixed Commitments) साधारणपणे ९७,००० रुपयांपर्यंत असू शकतात. यात घरखर्च, ईएमआय आणि विम्याचा समावेश आहे.

आरोग्य विमा (Health Insurance - ५० लाख कव्हर): ३,५०० रुपये/महिना

टर्म इन्शुरन्स (Term Insurance - १.५ कोटी कव्हर): ३,५०० रुपये/महिना

इतर घरगुती खर्च (अंदाजित): ९०,००० रुपये

या सर्व खर्चांनंतर, जोडप्याकडे संपत्ती निर्मितीसाठी (Wealth Creation) दरमहा ५३,००० रुपये शिल्लक राहतात. हीच रक्कम १० वर्षांत कोट्यवधींचे रूप घेऊ शकते.

असा आहे १.२४ कोटींचा 'मास्टर प्लॅन' (Asset Allocation)

१० वर्षांत १.२४ कोटींचे उद्दिष्ट गाठण्यासाठी ५३,००० रुपयांची विभागणी खालीलप्रमाणे करणे आवश्यक आहे:

१. इक्विटी म्युच्युअल फंड (Equity Mutual Funds): सर्वाधिक परतावा देणाऱ्या इक्विटी फंडात दरमहा २०,००० रुपयांची गुंतवणूक करावी. १० वर्षांत याचे मूल्य तब्बल ५८ लाख रुपये होऊ शकते.

२. हायब्रिड फंड (Hybrid Funds): संतुलित परताव्यासाठी हायब्रिड फंडात दरमहा १५,००० रुपयांची गुंतवणूक केल्यास, १० वर्षांनंतर हा निधी ३३ लाख रुपयांपर्यंत वाढू शकतो.

३. डेट म्युच्युअल फंड (Debt Mutual Funds): अल्पकालीन उद्दिष्टे आणि सुरक्षिततेसाठी डेट फंडात दरमहा १५,००० रुपये गुंतवावेत. याचे मूल्य २७ लाख रुपये होईल.

४. सोने (Gold Assets): पोर्टफोलिओला स्थैर्य देण्यासाठी दरमहा ३,००० रुपये सोन्यात (Gold ETF/Funds) गुंतवावेत. १० वर्षांत याचे मूल्य ६ लाख रुपये होईल.

एकूणच या शिस्तबद्ध 'ॲसेट अलोकेशन' पद्धतीचा अवलंब केल्यास, गुंतवणुकीची रक्कम स्टेप-अप (वाढवणे) न करताही १० वर्षांत एकूण फंड १ कोटी २४ लाख रुपये (५८+३३+२७+६ लाख) इतका जमा होतो. आर्थिक शिस्त आणि संयम असेल,

तर महागाईच्या काळातही आर्थिक स्वातंत्र्य मिळवणे शक्य आहे.

(टीप: म्युच्युअल फंड गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करणे आवश्यक आहे.)

Tags:    

Similar News