मुंबई | परेल येथील नरे पार्क मैदानावर डॉ. शिरोडकर हायस्कूलचा शताब्दी सोहळा पार पडला. यानिमित्ताने शाळेच्या इतिहासात प्रथमच आजी-माजी विद्यार्थी, पालक आणि सध्याचे विद्यार्थी एकत्र येत भव्य सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. शाळेचे ट्रस्टी कुवेस्कर सर व मुख्याध्यापिका तोरणे- माने मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शाळेच्या सर्व स्तरांतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला आहे.
शाळेचे ट्रस्टी कुवेस्कर सर व मुख्याध्यापिका तोरणे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली “२९ राज्य – २९ राहूटया” ही संकल्पना राबवण्यात आली आहे. यामध्ये शाळेतील माजी विद्यार्थ्यांचे मोठे योगदान लाभले. शाळेच्या पारंपरिक राहूटयांच्या संकल्पनेला आधुनिक स्वरूप देत, प्रत्येक राज्याची स्वतंत्र राहूटया उभारून त्या राज्यातील सांस्कृतिक नृत्यप्रकार विद्यार्थ्यांकडून सादर करण्यात आले. बालवर्गापासून ते हायस्कूल, कनिष्ठ महाविद्यालय, डी.एड. व व्यावसायिक शिक्षण घेणारे विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते.
शाळेच्या ७० वर्षांहून अधिक जुन्या परंपरेला नवे रूप देणारा हा कार्यक्रम शाळेच्या इतिहासात एक नवा अध्याय ठरला. “ज्या शाळेने मला घडवलं, त्या शाळेसाठी शताब्दी सोहळ्यानिमित्त काहीतरी करता आलं, याचा मला अभिमान आहे,” अशी भावना देवेंद्र शेलार यांनी व्यक्त केली.
शिरोडकर हायस्कूलचे संस्थापक रामचंद्र शिरोडकर सर यांच्या कार्याचा गौरव करत, शाळेच्या शताब्दी सोहळ्याने विद्यार्थ्यांना केवळ तंत्रज्ञान नव्हे तर संवादकौशल्य, कला, क्रीडा आणि स्वतःचा विचार विकसित करण्याची प्रेरणा दिली आहे. हा भव्य सोहळा शाळेच्या पटलावर सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाणार आहे.