राज्यातील २३ नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी आज मतदान; २१ डिसेंबरला निकाल

Update: 2025-12-20 05:22 GMT

राज्यातील २३ नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या अध्यक्ष व सदस्यपदांसाठी तसेच विविध नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील १४३ सदस्यपदांच्या जागांसाठी आज शनिवार, २० डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार आहे. या सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींची मतमोजणी सोमवार, २१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता सुरू होणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील एकूण २८८ नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम ४ नोव्हेंबर २०२५ रोजी जाहीर केला होता. या कार्यक्रमानुसार २ डिसेंबर २०२५ रोजी २६३ नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे.

तांत्रिक अथवा प्रशासकीय कारणांमुळे उर्वरित २३ नगरपरिषदा व नगरपंचायतींमध्ये आज मतदान होणार असून, त्या ठिकाणच्या अध्यक्ष, सदस्य तसेच विविध प्रभागांतील १४३ सदस्यपदांच्या जागांचा निर्णय मतदारांच्या मतदानातून होणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने सर्व ठिकाणी शांततेत व पारदर्शक पद्धतीने मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या असून, मतदान व मतमोजणी प्रक्रियेसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. २१ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता सुरू होणाऱ्या मतमोजणीनंतर राज्यातील सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींचे निकाल स्पष्ट होणार आहेत.

Tags:    

Similar News