राज्यसभा निवडणूक रंगली, काँग्रेसचा भाजपवर घोडेबाजाराचा आरोप

Update: 2020-06-13 02:05 GMT

गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, मणिपूर आणि मेघालयमध्ये राज्यसभेच्या एकूण १८ जागांसाठी १९ जून रोजी निवडणूक होणार आहे. पण गुजरातमध्ये काँग्रेसच्या काही आमदारांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे निवडणूक रंगतदार झाली आहे.

गुजरातमध्ये राज्यसभेच्या ४ जागा आहेत. संख्याबळानुसार काँग्रेस आणि भाजपचे दोन दोन उमेदवार निवडून येऊ शकतात. पण भाजपने इथे आणखी एक उमेदवार दिला आहे. त्यात काँग्रेसच्या तीन आमदारांनी राजीनामे दिल्याने काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांना रिसॉर्टमध्ये हलवले आहे.

हे ही वाचा..

राज्यात आत्तापर्यंत किती कोरोना चाचण्या घेतल्या गेल्या?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे बैठक

बापरे बाप!

त्याचबरोबर भाजप गुजरातमधील सत्तेचा दुरुपयोग करून घोडेबाजार करत असल्याची तक्रार काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली आहे. दरम्यान राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही भाजपवर घोडेबाजाराचा आरोप केला आहे. तसंच राजस्थानमधील काँग्रेस आमदारांनाही फोडाफोडीच्या भीतीने रिसॉर्टमध्ये हलवण्यात आले आहे. दरम्यान भाजप राजस्थानमधील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही काँग्रेसने केला आहे.

Similar News