Top
Home > Max Political > मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे बैठक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे बैठक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे बैठक
X

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची व्हिडीयो काँन्फरसिंगद्वारे बैठक होणार आहे. दिनांक १७ जून रोजी दुपारी ३ वाजता ही बैठक होणार असून बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत राज्याचे गृहमंत्री, आरोग्य मंत्री, मुख्य सचिव, पोलिस महासंचालक, गृह सचिव, आरोग्य सचिव असे सात जण उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान पंतप्रधान देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी १६ आणि १७ जूनला संवाद साधणार असून या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलं आहे.

राज्यात कोरोना चे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यातच लॉकडाऊन चे नियम शिथिल केल्यानं राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळं आता पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यावर कोणता निर्णय घेतात? याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

Updated : 12 Jun 2020 5:59 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top