मुंबईतील शेकडो शिक्षकांना निवडणुकीच्या कामाला जुंपले; कामावर बहिष्कार टाकू- अनिल बोरनारे

Update: 2024-02-11 09:59 GMT

मुंबई (प्रतिनिधी) : राईट टू एज्युकेशन कायद्यातील तरतुदीनुसार शिक्षकांना कोणत्याही प्रकारचे अशैक्षणिक कामे देऊ नये असे असतांना राज्यातील आगामी निवडणुकीच्या कामासाठी जुंपले जात असून या कामावर बहिष्कार टाकणार असल्याचे शिक्षक नेते व भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल बोरनारे यांनी सांगितले. याबाबत सोमवारी अनिल बोरनारे हे निवडणूक अधिकारी व शिक्षण अधिकाऱ्यांना भेटणार असून शिक्षकांना या कामातून वगळण्याची मागणी करणार आहेत.

काल रात्री अचानक शिक्षकांना हजर व्हायच्या सूचना शिक्षणाधिकाऱ्यांनी पत्राद्वारे केल्या, त्यामुळे मुलांना शिकवायचं कुणी ? परीक्षा कुणी घ्यायच्या असा प्रश्न निर्माण झाला आहे. युडायस, मुख्यमंत्री सुंदर शाळा, या सारखी असंख्य कामे सुरू आहेत शाळेतील परीक्षांचे नियोजन व इतर रोजची ऑनलाईन कामे करावी लागत असल्याने ही कामे सांभाळून निवडणुकीची कामे कशी करावी असा प्रश्न निर्माण झाला असून याविरोधात बहिष्कार टाकू असे आव्हान बोरनारे यांनी केले.



Full View


Tags:    

Similar News