Raju Srivastav : राजू श्रीवास्तव यांचे निधन , चाहत्यांनी सोशल मीडियावर जागवल्या आठवणी

गेल्या अनेक दिवसांपासून सुप्रसिध्द कॉमेडियन राजू श्रीवास्तव हे हृदयविकाराच्या झटक्यानंतर रुग्णालयात उपचार घेत होते. मात्र त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली. तर त्यांच्या निधनानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर आठवणी जागवल्या आहेत.

Update: 2022-09-21 06:27 GMT

गेल्या अनेक दिवसांपासून सुप्रसिध्द कॉमेडियन राजू श्रीवास्तव हे हृदयविकाराच्या झटक्यानंतर रुग्णालयात उपचार घेत होते. मात्र त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली. तर त्यांच्या निधनानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर आठवणी जागवल्या आहेत.

राजू श्रीवास्तव यांच्या निधनानंतर पत्रकार राहुल सिसोदिया यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, सबको हंसाने वाला एक दिन यूं मौन हो जाएगा, सोचा नहीं था। बहुत याद आओगे.

दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनीही वाहिली श्रध्दांजली

राजू श्रीवास्तव यांच्या अकाली निधनाची बातमी ऐकून दुःख झाले. त्याने आपल्या अप्रतिम कॉमिक टायमिंगने आम्हा सर्वांना इतके वर्ष खूप हसवले. मात्र त्याच्या निधनामुळे आम्ही एक रत्न गमावले आहे. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटूंबातील सदस्य आणि चाहत्यांना माझ्या मनापासून संवेदना, अशा शब्दात हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी श्रध्दांजली वाहिली.

ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी राजू श्रीवास्तव यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना म्हटले की, स्टँड अप कॉमेडीच्या माध्यमातून जगाला हसवण्याची दुर्मिळ भेट मिळालेल्या राजू श्रीवास्तव यांना श्रध्दांजली.

नितीन सिंग या ट्वीटर वापरकर्त्याने म्हटले आहे की, तुम्ही देशाला स्टँड अप कॉमेडी हा सुध्दा व्यवसाय असू शकतो, हा विश्वास देशाला दिला, आम्ही तुम्हाला खूप मिस करत आहोत, असं मत व्यक्त केले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्वीट करून राजू श्रीवास्तव यांना श्रध्दांजली वाहिली. यामध्ये म्हटले आहे की, सुप्रसिध्द हास्य कलाकार राजू श्रीास्तव यांचा एक वेगळा अंदाज होता. त्यांच्या अद्भुत प्रतिभेने लोकांना प्रभावित केले. त्यांचे निधन ही कला जगताची मोठी हानी आहे. मी त्यांच्या कुटूंबियांच्या प्रति संवेदना व्यक्त करतो.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही व्यक्त केले दुःख

गेल्या अनेक दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या राजू श्रीवास्तव यांचे निधन झाले. त्यांचे निधन झाल्याने ही मनोरंजन विश्वाला हादरा असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करून व्यक्त केले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रध्दांजली वाहताना म्हटले की, तुम्ही आम्हाला हसवताना चांगले वाटत होता, रडवताना नाही. राजू श्रीवास्तव यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. ते आमचे मित्र होते. तर ते सध्या आपल्यात राहीले नाहीत. आम्ही विचारही केला नव्हता की, 13 मे रोजी वर्सोवा फेस्टिवलमध्ये झालेली त्यांची भेट शेवटची भेट ठरेल.

Tags:    

Similar News