शरीरसुखाची मागणी करून महिलेले तडकाफडकी कामावरुन काढले, महिलेचं आमरण उपोषण

Update: 2021-01-31 16:36 GMT

रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील कोप्रोन लिमिटेड या औषध निर्माण कंपनी मध्ये 2012 पासून ते 2020 पर्यत काम करणाऱ्या दीपाली लोणकर यांना तडकाफडकी कमी केलं आहे. आपल्याला न्याय मिळावा या मागणीसाठी दिपाली लोणकर खालापूर तहसील कार्यालयासमोर गेल्या 7 दिवसांपासून उपोषण करत आहेत. तालुक्यातील कोप्रान लिमिटेड या औषध निर्माण करणा-या कारखान्यात गुणवत्ता मापन विभागात त्या काम करत आहेत.

Full View

काय आहे प्रकरण?

उपोषणकर्त्या दिपाली लोणकर यांनी कोप्रान कंपनीतील मॅनेजर संजय खोत यांनी त्यांच्याकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप केला आहे. तसंच या संदर्भात खालापूर पोलीस स्थानकात भा. द. वि. संहिता कलम 354 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

25 नोव्हेंबर ला त्यांना कामावरून कमी करण्यात आल्याची नोटीस देण्यात आली. असं त्याचं म्हणणं आहे. सात वर्षाच्या मुलीची जबाबदारी माझ्यावर आहे. आर्थिक परिस्थिती बिकट झाली असून कामावर परत घ्यावे. यासाठी दिपाली यांनी तहसीलदार इरेश चप्पलवार यांची देखील भेट घेतली होती.

दोन दिवसापूर्वी कारखाना व्यवस्थापन आणि उपोषणकर्त्या दिपाली लोणकर यांचे म्हणणे तहसिलदार चप्पलवार यांनी ऐकून घेतले. आणि उपोषणापासून परावृत्त करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, जोपर्यंत न्याय मिळत नाही. तोपर्यंत आपण उपोषण करणार असा निर्धार दिपाली यांनी केला आहे.

यावेळी बोलताना खालापूर तहसीलदार इरेश चप्पलवार यांनी सांगितले की उपोषणकर्ते व कंपनी व्यवस्थापन, पोलिस प्रशासन यांच्या मध्यस्तीने याप्रकरणी तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. तीन वेळा प्रशासन स्थरावर बैठका पार पडल्या.

सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने उपोषणकर्ते व व्यवस्थापन यांनी समन्वयातून निर्णय घेतल्यास प्रश्न सुटेल असे सांगितले. या संदर्भात कोप्रोन कंपनी व्यवस्थापनाशी सातत्याने संपर्क साधला असता प्रतिसाद न मिळाल्याने तूर्तास व्यवस्थापनाची भूमिका समजू शकली नाही.

Tags:    

Similar News