ट्विटरचा पक्षपातीपणा उघड, तक्रारीनंतर राहुल गांंधी यांचे ४० लाख फॉलोअर्स वाढले

Update: 2022-03-07 09:50 GMT

दिल्लीत ऑगस्ट 2021 मध्ये झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर राहुल गांधी यांनी पिडीतेच्या कुटूंबियांची भेट घेतली. त्यानंतर राहुल गांधी यांनी पिडीतेच्या कुटूंबियांसोबतचा फोटो पोस्ट केला. त्यावरुन ट्वीटरने कारवाई करत राहुल गांधी यांचे अकाऊंट आठ दिवसांसाठी निलंबित केले होते. त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता.




 


काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ऑगस्ट 2021 मध्ये दिल्लीतील बलात्कार पिडीतेच्या कुटूंबियांची भेट घेतली होती. त्यानंतर राहुल गांधी यांचे ट्वीटर अकाऊंट वादात सापडले होते. त्यामुळे ट्वीटरने राहुल गांधी यांच्या ट्वीटर अकाऊंटवर कारवाई केली होती. त्यानंतर राहुल गांधी यांच्या ट्वीटर अकाऊंटची फॉलोवर्स संख्या थांबली होती. त्यावरुन राहुल गांधी यांनी ट्वीटरकडे फॉलोवर्स वाढत नसल्याची तक्रार केली होती. त्यानंतर राहुल गांधी यांचे फॉलोवर्स मोठ्या प्रमाणात वाढण्यास सुरूवात झाली आहे. तर आतापर्यंत राहुल गांधी यांचे 20 लाख फॉलोवर्स झाले आहेत.




 



राहुल गांधी यांनी तक्रार केली त्यावेळी 19.6 लाख फॉलोवर्स होते. 26 जानेवारीनंतर आतापर्यंत राहुल गांधी यांच्या फॉलोवर्समध्ये 80 हजार पेक्षा अधिक फॉलोवर्स वाढले आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांनी तक्रार केल्यानंतर त्यांच्या फॉलोवर्सची संख्या वाढल्यामुळे राहुल गांधी यांचे ट्वीटर अकाऊंट जाणून बुजून गोठवल्याचे सिध्द होत असल्याचा आरोप काँग्रेस समर्थकांकडून केला जात आहे. तर सोशल मीडियावरही काँग्रेसचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही काँग्रेसकडून करण्यात आले आहे.

Tags:    

Similar News