राहत फतेह अलीखाँनचा मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल; तात्काळ दुसरा माफीचा व्हिडीओ केला व्हायरल

Update: 2024-01-29 05:54 GMT


सध्या प्रसारमाध्यमांच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर पाकस्थानचे प्रसिध्द गायक उस्ताद राहत फतेह अली खाँन यांचा एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत असाताना दिसत आहे, ज्यात ते आपल्या घरी त्यांच्या एका शिष्याला अमानुषपणे मारहाण करत आहेत असं दिसतं, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जगभरातून यावर संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

राहत फतेह अली खाँन यांनी पाकस्थानासह भारतामध्येही अनेक चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. त्यातली अनेक गाणी ही जगभर प्रसिध्द ही झाली मात्र हा व्हिडीओ प्रसारमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर राहत फतेह खाँन हे नव्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.व्हायरल झालेल्या सदरच्या व्हिडीओ क्लिपमध्ये राहत फतेह अली खाँन हे लोकांच्या समोर एका युवकाला मद्याच्या बाटलीवरुन मारहाण करत आहेत या दृश्यातला युवक हा त्यांचा शिष्य असल्याचं सांगितलं जात आहे.त्यानंतर राहत फतेह अली खाँन यांनी आपला शिष्य व त्याच्या वडिलांसोबत एक व्हिडीओ प्रसिध्द करत झालेल्या घटनेप्रकरणी सविस्तर स्पष्टीकरण आणि माफी मागितली आहे. ही पोस्ट पाकिस्थानमधील वरिष्ठ पत्रकार तारिक मतीन यांनी शेअर केली होती. 

Tags:    

Similar News