प्रशांत कदम यांचा ABP माझाला राम.. राम..

Update: 2023-10-26 06:37 GMT

काही महिन्यापूर्वी आदर्श ग्रामीण पत्रकारीता पुरस्कार प्राप्त करणारे प्रशांत कदम यांनी एबीपी माझाला राम राम ठोकला आहे. त्यांनी दसऱ्याच्या मुहुर्तावर राजीनामा देत स्वत:चं युटुब चॅनल सुरू केलं आहे. प्रशांत कदम यांनी एक्स पोस्ट करत माहिती दिली आहे. प्रशांत कदम हे दिल्लीतून पत्रकारीता करत होते. मोदींच्या उदयानंतर दिल्लीची राजकीय संस्कृती बदलून गेली असल्याचं प्रशांत कदम म्हणालेत.

दरम्यान यावर प्रशांत कदम म्हणाले की "दसऱ्याच्या मुहूर्तावरच हे सीमोल्लंघन करतोय. मुख्य प्रवाहातल्या माध्यमांत सलग 16 वर्षे काम केल्यानंतर खरंतर स्थिरतेचे वेध लागायला हवेत. पण त्या स्थिरतेत न रमता नवी धडपड करण्याचा हा प्रयत्न आहे. त्यासाठी एक पाऊल मी टाकलं आहे, एक पाऊल तुम्हाला टाकावं लागणार असल्याच त्यांनी सांगितल. पत्रकारितेतलं सत्व टिकवून ठेवण्यासाठीचा हा प्रयोग आहे, नवीन पत्त्यावर भेटत राहू असं वक्तव्य त्यांनी एक्स पोस्टच्या माध्यमातून केलं आहे.

प्रशांत कदम यांचा नव्या युट्यूब चॅनल प्रवासाला सुरूवात

ज्या पत्रकारितेवर विश्वास आहे. ती पत्रकारिता करायला मिळावी म्हणुन कोलालाहमधून थोडीशी विश्रांती घेत, बाहेर निघत, घटनांकडे बघण्याचा मार्ग म्हणून हे युट्युब चॅनल उघडत आहे. या युट्युब चॅनलवर विश्लेषण नाही तर इतर सुद्धा गोष्टी हातळायच्या आहेत त्याआधी महत्वाचं आहे. Prashant kadam हे चॅनल युट्युबवर सबस्कॉइब करा शेअर करा आणि प्रक्षेकांच्या प्रतिक्रिया ही कळवण्याच आवाहन कदम यांनी केलं आहे.

https://www.youtube.com/@PrashantKadamwideangle

Full View

काय आहे महुआ मोएत्रा प्रकरण ? पत्रकार प्रशांत कदम यांच सविस्तर विश्लेषण

सरकार योग्य मार्गावर चालतंय की नाही यासाठी सरकारला प्रश्न विचारण आवश्यक आहे. देशात एक वेगळा काळ आला आहे. जे कोणी प्रश्न विचारत आहेत ते आरोपी बनत चालले आहेत चौकशीच्या घेऱ्यात देखील अडकत आहेत. तृणमूल खासदार महुआ मोएत्रा या लोकसभेती सर्वात आक्रमक खासदार आहेत. मोदी सरकारविरोधात त्यांची तोफ सातत्याने धडाडत असते. संसदेत यांनी प्रश्न विचारण्यासाठी लाच घेतल्याचा आरोप करत भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभा अध्यक्षांकडे चौकशीसाठी पत्र लिहिले आहे. लोकसभेत सर्वाधिक असलेला हा आक्रमक चेहरा त्यामुळे अडचणीत आला आहे. नेमकं काय आहे हे सगळं प्रकरण? यावर पत्रकार प्रशांत कदम यांनी सविस्तर विश्लेषण केलं आहे.

Full View

Tags:    

Similar News