कशेडी घाटात प्रवाशांची अँटिजन चाचणी, जिल्हा बंदी नसल्याने कोकणात जाणाऱ्यांची गर्दी

Update: 2021-04-18 03:43 GMT

रायगड - राज्यात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केला आहे, मात्र यात जिल्हाबंदी नसल्याने प्रवासी मोठ्या संख्येने ये-जजा करत आहेत. सध्या मुंबई, ठाणे, पुणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. अनेकजण सध्या कोकणच्या दिशेने आपापल्या गावी जात आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात तळकोकणात देखील रुग्णाच्या संखेत वाढ होत असल्याने रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर कशेडी बंगला येथे आरोग्य तपासणी केंद्र उभे केले आहे.

या केंद्रात रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांची अँटीजन टेस्ट करून जिल्ह्यात प्रवेश देण्यात येत आहे. त्याचबरोबर प्रवासी आरटीपीसीआर टेस्टचे अहवाल सोबत घेऊन येत आहे, त्यांचीही नोंदवणी केली जाते आहे. शनिवारपासून आजपर्यंत या तपासणी केंद्रात दोन पॉझीटिव्ह रुग्ण आढळून आले असल्याने जवळच असलेल्या रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार देखील सुरू आहेत. तर जे प्रवासी अँटीजन टेस्टला नकार देत आहेत, त्यांना प्रशासनाकडून माघारी पाठवण्यात येत आहे.

Tags:    

Similar News