Patra Chawl Case : संजय राऊत तुर्तास कोठडीतच!

Update: 2022-10-10 10:49 GMT

शिवसेना पक्षच अडचणीत सापडला असताना आता उध्दव ठाकरेंच्या चिंतेत भर टाकणारी आणखी एक बातमी समोर येत आहे. शिवसेनेचा आवाज असलेले संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत आणखी वाढ करण्यात आली आहे. १७ ऑक्टोबर पर्यंत संजय राऊत यांना कोठडीत राहावं लागणार आहे.

३१ जुलै ला संजय राऊत यांना पत्रा चाळ गैरव्यवहार प्रकरणी इडी ने कारवाई करत अटक केली होती. त्यानंतर संजय राऊत यांनी जामीनासाठी इडीच्या पीएमएलए न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर २७ सप्टेंबर ला सुनावणी पार प़डली होती. त्यावेळी त्यांची कोठडी १० ऑक्टोबर पर्यंत वाढवण्यात आली होती. पुन्हा आज झालेल्या सुनावणीमध्ये त्यांच्या कोठडीत १७ ऑक्टोबर पर्यंत वाढ करण्यात आली आहे.

पत्रा चाळीच्या १०३९ कोटींच्या गैरव्यवहारात सुरूवातीपासून संजय राऊत यांचा सहभाग होता असा आरोप इडीने केला होता. या प्रकरणात संजय राऊत यांच्या विरोधात इडी ने आरोपपत्र दाखल केलं होतं.

Tags:    

Similar News