पंढरपूर मंगळवेढा निवडणूक: अपक्षांची भूमिका महत्त्वाची…

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत कोण मारणार बाजी? मतदानानंतर काय आहे स्थानिक पत्रकार आणि स्थानिक लोकांचं मत…

Update: 2021-04-17 16:31 GMT

राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचं कोरोनाने निधन झाल्यानंतर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात आज पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडलं. भाजपकडून समाधान अवताडे तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून भगीरथ भालके मैदानात आहे.

आज तीन लाख चाळीस हजार मतदारांना पुन्हा एकदा मतदानाचा हक्क बजावला. दोन्ही पक्षाकडून प्रचाराची राळ उडविण्यात आली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांनी या ठिकाणी प्रचार सभा घेतली. तर भारतीय जनता पक्षाचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह माजी मंत्री सदाभाऊ खोत, बाळा भेगडे, लक्ष्मण ढोबळे यांच्या जोडीला खासदार महाराज स्वामी, प्रशांत परिचारक यांनी समाधान अवताडे यांच्यासाठी प्रचार केला.

एकूणच भगीरथ भालके व समाधान आवताडे यांच्यासाठी गल्लीबोळातून कॉर्नर सभा घेण्यात आल्या होत्या. मात्र, यामध्ये अपक्षांची भूमिका महत्वाचं असल्याचं स्थानिक पत्रकारांचं मत पाहा विद्यार्थी प्रतिनिधी अजिंक्य आड़के आणि अतुल होवाळे यांनी
 केेलेली बातचीत

Full View

Tags:    

Similar News