शेलार यांना मंत्री न करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, विधानभवन परिसरात विरोधकांची घोषणाबाजी

भाजपचे ज्येष्ठ नेते आशिष शेलार यांना मंत्रिपद न दिल्याने विरोधी पक्षाने विधानभवन परिसरात घोषणाबाजी केली.

Update: 2023-03-14 07:00 GMT

शिंदे - फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची अनेकदा चर्चा होत असते. त्यातच मंत्रिमंडळाचा विस्तार अधिवेशनापूर्वी होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र या अधिवेशनातही मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. त्यामुळे आशिष शेलार यांच्यासारख्या भाजपमधील महत्त्वाच्या नेत्यांची मंत्रीपदी वर्णी लागली नाही. त्यामुळे आशिष शेलार नाराज असल्याची चर्चा रंगली होती. दरम्यान विरोधी पक्षाने आशिष शेलार यांना मंत्री न करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा दिल्या.

अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. त्यातच विरोधी पक्षाने अर्थसंकल्पातून सामान्य माणसाला काहीही न मिळाल्याचं सांगत निदर्शनं केली. यामध्ये एक दिवस भोपळा,एक दिवस गाजर दाखवत प्रतिकात्मक टीका केली. मात्र आज शेतकऱ्यांचा लाँग मार्च, जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा याबरोबरच कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या वक्तव्यावरून निदर्शनं केले.

यावेळी अब्दुल सत्तर यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्षाने केली. तेव्हा भाजप नेते आशिष शेलार हे तिथून जात असताना महाविकास आघाडीच्या आमदारांनी शेलारांना मंत्री न करण्याऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा दिल्या.

Tags:    

Similar News