सपना चौधरीच्या कार्यक्रमावरुन धनंजय मुंडे यांच्यावर विरोधकांची टीका

Update: 2021-11-08 03:50 GMT

बीड : एकीकडे आजही अनेक अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना सरकारची आर्थिक मदत पोहोचलेली नाही, शेतकरी आत्महत्या करत आहे, तर दुसरीकडं एसटी कर्मचारी आपली दिवाळी आगारातच साजरी करत आहे. अशा परिस्थितीत महाविकास आघाडी सरकार मध्ये सामाजिक न्यायमंत्री असलेले धनंजय मुंडे यांनी परळीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात सपना चौधरी डान्स पाहायला मिळाला. यावरून आता सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर विरोधकांनी जोरदार टीका सुरू केली आहे.

याआधीही 2018 मध्ये नाथ फेस्टिव्हल मध्ये सपना चौधरीच्या "तेरी आंखो का ये काजल" गाण्यानंतर धनंजय मुंडेंवर टीका झाली होती. एकीकडे राज्यात कोरोनाचं सावट कायम असताना सर्वसामान्यांना सरकारकडून निर्बंध पाळण्याचे आवाहन केले जात आहे. तर दुसरीकडे मात्र राज्यातील मंत्रीच असं वागत असल्याने संताप व्यक्त केला जातोय.

कोरोनाचे संकट, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, त्यात अनेकांना अजुनही आर्थिक मदत मिळाली नाही त्यामुळे एकीकडे काळी दिवाळी साजरी होत असताना असे कार्यक्रम आयोजित करणं कितपत योग्य आहे? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Tags:    

Similar News