साने गुरूजी यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त सेवा दल चळवळीची फैजपूर ते मुंबई‘संविधान निर्धार यात्रा’
साने गुरूजी यांचे १२५ वे जयंती वर्ष तसेच १९२३ साली काकीनाडा काँग्रेस अधिवेशनाच्या प्रसंगी सुरू झालेल्या‘सेवा दल आंदोलना’चा शतक महोत्सव, यांचे औचित्य साधुन राष्ट्र सेवा दल येते वर्षभर विविध उपक्रम राबविणार आहे. त्यांची सुरूवात उद्या फैजपुर येथुन ‘संविधान निर्धार यात्रे’ने होत आहे.
१९३६ च्या फैजपुर येथील कॉंग्रेस अधिवेशनाच्या वेळी साने गुरूजी यांनी तरूणांना सोबत घेत मुंबई ते फैजपुर अशी ‘ध्वजज्योत यात्रा’ काढली होती. स्वातंत्र्यासाठी जागृती निर्माण करत ही यात्रा फैजपुर येथे पोहोचली आणि स्वातंत्र्य सेनानी धनाजी नाना चौधरी यांच्या हस्ते ही ध्वजज्योत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हाती देण्यात आली. ही ज्योत आजही फैजपुर येथे तेवती ठेवण्यात आली आहे.
या ज्योतीपासुन प्रेरणा घेत सेवा दलाचे सैनिक २१ डिसेंबर रोजी फैजपुर येथुन निघतील व २४ डिसेंबर रोजी मुंबईत होणाऱ्या ‘संविधान निर्धार सभे' त दाखल होतील. या मार्गावरील १० ठिकाणी सभा व अन्य कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत