Sameer Wankhede यांच्या खात्यांतर्गत चौकशीत काय झालं?

Update: 2021-10-29 13:18 GMT

NCBचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर आर्यन खान प्रकरणातील पंच प्रभाकर साईल यांनी खंडणीचा गंभीर आरोप केला आहे. यानंतर NCBने समीन वानखेडे यांच्या खात्यांतर्गत चौकशीसाठी एक समिती तयार केली आहे. या समितीने मुंबईत येऊन तपास सुरू केला आहे. या तपासात संबधित सगळ्यांची चौकशी केल्याशिवाय निष्कर्षांपर्यंत येऊ शकत नाही असे तपास समितीचे अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितले आहे. क्रुझवरील कारवाईतील पंच प्रभाकर साईलने जे माध्यमांना सांगितले आहे, त्यासाठी एक चौकशी समिती तयार करण्यात आली आहे.

प्रभाकर साईल हे या चौकशीमधील महत्त्वाचे साक्षीदार आहेत. त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू असून त्यांनी चौकशीला सहकार्य करावे, असे आवाहन सिंह यांनी केले आहे. त्यांची चौकशी केल्या शिवाय ठोस पुरावे येऊ शकत नाही, त्यामुळे साईल हे मुंबई पोलिसांच्या संपर्कात असल्याने आम्ही पोलिसांनाही मदतीचे आवाहन केल्याची माहिती ज्ञानेश्वर सिंह यांनी दिली आहे. दरम्यान या प्रकरणातील आणखी एक पंच के.पी. गोसावी कोठडीत आहेत. त्यामुळे न्यायालयाला विनंती करुन चौकशीसाठी त्यांना ताबा मागणार असल्याची माहितीही ज्ञानेश्वर सिंह यांनी दिली आहे.

Tags:    

Similar News