काय आहे मोदी-अदानींचं कनेक्शन? Rahul Gandhi नी लोकसभेत डागली तोफ

Update: 2023-02-07 11:25 GMT

आज संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणवरील चर्चेत काँग्रेस नेते राहुल गांधींनी (Rahul Ganadhi) उद्योजक गौतम अदानी( Gautam adnai)आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यातील कनेक्शनवर जोरदार हल्ला केला. नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना काही घटनांमुळे त्यांचा मोठ्या प्रमाणात विरोध झाला त्यावेळी मोदींच्यामागे ठामपणे फक्त गौतमी अदानीच उभे राहिल्याचा गौप्यस्फोट राहुल गांधीनी लोकसभेत केला.

राहुल गांधी म्हणाले, मी भारत जोडो यात्रेवेळी देशभरातील अनेक राज्यांत फिरलो. त्यावेळी माझ्याकडे लोकांनी सवाल केला की, अदानी कसकाय अनेक क्षेत्रांमध्ये अचानक पुढे जात आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांचे फक्त एक-दोन बिझनेस होते, पण आता त्यांचे आठ-दहा बिझनेस आहेत, हे असं कसं शक्य झालं? असा सवाल मला अनेकांनी केल्याचं गांधी यांनी संसदेत म्हंटलंय.

या प्रकरणावर भाष्य करताना गांधी पुढे म्हणाले, 2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान बनले आणि खरी जादू सुरू झाली. काही वर्षातच अदानी जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले. काही वर्षांपूर्वी सरकारने विमानतळाच्या विकासाची योजना आखली. मोदी आणि अदानीच्या एकत्रीत फोटोचा बॅनर झळकवत राहुल गांधी म्हणाले, आज सगळीकडे अदानींचे नाव आहे.

रस्ता कोणी बांधला तर अदानींचे नाव समोर येईल. हिमाचलमधील सफरचंदावरदेखील अदानींचे नाव असल्याचेही राहुल गांधी यांनी म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानी यांचे संबंध कसे आहेत, हे देशाला जाणून घ्यायचे असल्याचे सांगत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जुने फोटो सभागृहात झळकावले. त्यावरून सत्ताधारी भाजपने सभागृहात जोरदार गोंधळ घातला. अदानी हे 2014 मध्ये सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत 609 क्रमांकावर होते. त्यानंतर 9 वर्षात थेट दुसऱ्या क्रमांकावर पोहचले. ही जादू मोदीजी दिल्लीत आल्यानंतर सुरू झाली असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.

जेव्हा ही योजना आखण्यात आली होती तेव्हा, एक नियम होता ज्यांना अनुभव नाही, त्यांना विमानतळ देता येत नव्हते. पण, हा नियम भाजप सरकारने बदलला आणि विमानतळांचे खासगीकरण करुन अदानींच्या हातात सहा विमानतळ दिले. यानंतर अदानींनी देशातील सर्वाधिक एअर ट्रॅफिक स्वतःच्या विमानतळांवर वळवल्याचंही त्यांनी म्हंटलंय.

राहुल गांधी म्हणाले की, तरुण आम्हाला विचारत आहेत की अदानी फक्त 8-10 सेक्टरमध्ये आहे. अशा परिस्थितीत त्यांची संपत्ती 2014 मध्ये 8 अब्ज डॉलरवरून 2022 मध्ये 140 अब्ज डॉलरवर कशी पोहोचली? असा प्रश्न विचारत आहेत.

राहुल गांधी म्हणाले की, मला पंतप्रधान मोदींना दोन-तीन प्रश्न विचारायचे आहेत. आधी पंतप्रधान मोदी अदानीच्या विमानात जायचे. आता अदानी पीएम मोदींच्या विमानात जातात. राहुल गांधी यांनी 'पीएम मोदींच्या विदेश दौऱ्यात तुम्ही आणि अदानी किती वेळा एकत्र गेलात, 'तुम्ही अदानीला किती वेळा भेटलात?, तुमच्यासोबत अदानी किती परदेश दौऱ्यावर आले? तुमच्या भेटीनंतर अदानींना किती देशांमध्ये कंत्राट मिळाले? आदी प्रश्न राहुल गांधी उपस्थित केले.

तसेच नरेंद्र मोदी यांनी अदानींना बांग्लादेशातले मोठे पॉवर प्रोजेक्ट मिळवून दिले आहेत. त्यानंतर मोदी श्रीलंकेला गेले आणि तेथील सरकारवर दबाव टाकून एक मोठा विंड प्रोजेक्ट अदानींना मिळवून दिला. सरकारी कंपनी असलेल्या LIC चा पैसाही अदानींच्या कंपनीत लावून मोठी मदत केल्याचाही खुलासा त्यांनी यावेळी केला.

दरम्यान, अदानी देशाच्या अर्थ क्षेत्रात हस्तक्षेप करतात, डिफेन्स क्षेत्रात हस्तक्षेप करतात. शेल कंपन्यांच्या माध्यमातून पैसे भारतात आणले जात आहेत. या कंपन्या कोणाच्या आहेत, हे तपासण्याचे काम सरकारचे असल्याचंही त्यांनी म्हंटलय.


Full View

Tags:    

Similar News