भुजबळांनी जागवल्या तुरूंगातील त्या दिवसांच्या आठवणी....

Update: 2021-10-30 09:42 GMT

नाशिक : "जे पोलिस पुर्वी माझ्या स्वागतासाठी उभे असायचे तेचनंतर माझ्यावर कारागृहात लक्ष ठेवत होते.", असं म्हणत राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या तुरूंगातील आटवणींना उजाळा दिला. नाशिक कारागृहातील कैद्यांनी बनवलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन मंत्री छगन भुजबळ यांनी केले. त्याप्रसंगी बोलत होते.

यावेळी या उद्घाटन प्रसंगी ते म्हणाले, " अनेक स्वतंत्र्यसैनिक या नाशिकच्या कारागृहात राहिले आहेत. इतकंच काय साने गुरुजी देखील याठिकाणी होते. कारागृहात येणाऱ्या कैद्यांमध्ये नाना तऱ्हेचे लोक असतात. यातील काही समाजाला नकोसे असतात. तर काही लोकांचा जमीन झाला तरी ते परत आत येतात. कारागृहात सगळ्या सोयी सुविधा असल्याने काहींचं आत येणं जाणं सुरू असतं."

यावेळी बोलत असताना भुजबळांच्या कारावासातील आठवणी ताज्या झाल्या. त्या आठवणींना उजाळा देताना ते म्हणाले, "माझा देखील आर्थर रोड तुरूंगातील दोन अडीच वर्षांचा अनुभव आहे. गृहमंत्री असताना कारागृहातील पोलिसांचा पगार मीच वाढवला आणि एक दिवस त्याच तुरूंगात मला जावं लागलं. जे पोलिस याआधी माझ्या स्वागतासाठी असायचे, नंतर तेच माझ्यावर लक्ष ठेवण्यासाठी काम करत होते. आता दिवस परत बदलले आहेत. काही खऱ्या आरोपा खाली जेल मध्ये असतात तर काही खोट्या आरोपांखाली असतात."

कारागृहातील कैदी कलाकारांबद्दल बोलताना भुजबळ म्हणाले, "कारागृहात सिनेमाचे कलाकार असतात तसे इतरही कलाकार असतात. संजय दत्त यांनी देखील कारागृहात टोप्या बनवल्याच मला आठवतंय. कैदी कसे जनावरां सारखे राहतात हे मी स्वतः पाहिलं आहे. प्रचंड गर्दी असते. पण तरी देखील कोरोना कारागृहात घुसला नाही हे महत्वाचे! अनेक लोक 15 हजारांचा जमीन भरू शकत नाही म्हणून वर्षानुवर्षे आत आहेत. अशा लोकांसाठी काम करणाऱ्या आता अनेक संस्था आहेत, मी देखील त्यासाठा कार्यरत आहे.", असं म्हणत भुजबळांनी कैद्यांसंबंधातील अनेक मुद्दयावर भाष्य केलं.

Full View

Tags:    

Similar News