भारत-चीन दरम्यान लष्करी चर्चा, ११ तास चालली बैठक

Update: 2020-06-23 02:33 GMT

गलवानमध्ये भारत आणि चीन दरम्यान निर्माण झालेल्या संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाल्यानंतर दोन्ही देशांमध्ये मोठा तणाव निर्माण झालेला आहे.

भारताने चीनच्या सीमेवर आपल्या हालचाली वाढवलेल्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर भारत आणि चीन दरम्यान सोमवारी लष्करी पातळीवर चर्चेला सुरुवात झाली. भारताचे कमांडर लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग यांनी चीनमधील मोल्दो येथे जाऊन चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता सुरू झालेली बैठक अकरा तासांनी संपल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली याची माहिती अजून उपलब्ध होऊ शकले नाही.

हे ही वाचा..

चीनमधील कंपन्यांसोबत करण्यात आलेले करार खरंच रद्द करण्यात आले आहेत का?

भारत-चीन वाद: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सल्ला

“सॅटेलाइट फोटोत चीनने आपल्या जमिनीचा ताबा घेतल्याचं स्पष्ट दिसतंय”: राहुल गांधी

याआधी कमांडर पातळीवर सहा जून रोजी झालेल्या चर्चेमध्ये दोन्ही देशांनी गलवान खोऱ्यामधून आपलं सैन्य मागे घेण्याचे मान्य केलं होतं. पण चीनने दिलेला शब्द पाळला नाही आणि त्यानंतर सैनिकांमध्ये हा संघर्ष झाला.

या संघर्षात चीनचे 43 सैनिक मारले गेले अस़ेही वृत्त ANI या वृत्तसंस्थेने दिले आहे. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली आणि यापुढे पुन्हा बैठक होणार आहे की नाही ते अजून समजू शकलेले नाही.

Similar News