Top
Home > News Update > “सॅटेलाइट फोटोत चीनने आपल्या जमिनीचा ताबा घेतल्याचं स्पष्ट दिसतंय”: राहुल गांधी

“सॅटेलाइट फोटोत चीनने आपल्या जमिनीचा ताबा घेतल्याचं स्पष्ट दिसतंय”: राहुल गांधी

“सॅटेलाइट फोटोत चीनने आपल्या जमिनीचा ताबा घेतल्याचं स्पष्ट दिसतंय”: राहुल गांधी
X

लडाखमधील गलवान खोऱ्यामध्ये कोणतीही घुसखोरी झालेली नाही. असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठकीनंतर केला. पण यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता.

“चिनी हल्ल्यानंतर पंतप्रधानांनी भारतीय भूभाग हवाली केला. जर जमीन चीनची होती”, “आमच्या जवानांना का मारण्यात आलं?, त्यांना कुठे मारण्यात आलं?”, असा सवाल राहुल यांनी केला होता.

त्यानंतर राहुल गांधी यांच्या या प्रश्नानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ( Amit Shah) यांनी राहुल गांधी यांना उत्तर दिलं होतं.

या आरोप प्रत्यारोपाच्या गदारोळात गलवान खोऱ्यात जखमी झालेल्या एका जवानाच्या वडिलांनी यात राजकारण करू नका, असं केलं होतं. हा व्हिडीओ ट्विट करत अमित शाह यांनी राहुल गांधी यांना उत्तर दिलं होतं.

आजही राहुल यांनी मोदींना तिखट सवाल करत मोदींना घेरण्यासाठी दोन ट्विट केलं आहे. नरेंद्र मोदी हे सरेंडर मोदी आहेत, असं ट्विट राहुल गांधींनी केलं. हे ट्विट करताना राहुल गांधींनी जपान टाईम्सनं मोदींच्या रणनितीवर लिहिलेला लेख जोडला आहे.

त्यानंतर पुन्हा एकदा ‘आज तक’ या वृत्त वाहिनीचे सीमेवरील फोटो ट्विट केले आहे.

“पंतप्रधानांनी भारतीय हद्दीत कोणीही घुसखोरी केलेली नाही आणि लष्करी तळही ताब्यात घेतलेले नाहीत असं म्हटलं आहे. पण सॅटेलाइट फोटोत चीनने पँगाँग येथे पवित्र भारतीय जमिनीचा ताबा घेतल्याचं दिसत आहे”.

असं म्हणत मोदींवर प्रश्नांचे बाण सोडले आहेत.

Updated : 21 Jun 2020 3:07 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top