Home > News Update > चीनमधील कंपन्यांसोबत करण्यात आलेले करार खरंच रद्द करण्यात आले आहेत का?

चीनमधील कंपन्यांसोबत करण्यात आलेले करार खरंच रद्द करण्यात आले आहेत का?

चीनमधील कंपन्यांसोबत करण्यात आलेले करार खरंच रद्द करण्यात आले आहेत का?
X

चीन मधील कंपन्यासोबत गेल्या आठवड्यात महाराष्ट्र सरकारने 5 हजार कोटी गुंतवणूकीचा करार केला आहे. मात्र, हा करार रद्द केला असल्याची चर्चा आहे. महाराष्ट्र शासनाने दिलेल्या माहिती नुसार सामंजस्य करार रद्द केलेले नाहीत. तर जैसे थे स्थितीत ठेवण्यात आलेले आहेत.

हेंगली, पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्युशन्स जेव्ही विथ फोटोन आणि ग्रेट वॉल मोटर्स या चीन येथील तीन कंपन्यांसमवेत महाराष्ट्र शासनाने दि.१५ जून, २०२० रोजी केलेले सामंजस्य करार तूर्तास जैसे थे ठेवण्यात आले आहेत, असे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले आहे. हे करार तूर्तास जैसे थे ठेवण्यात आले आहेत, याचा अर्थ ते रद्द केले असा नसून त्यावरील पुढील कार्यवाही प्रतीक्षाधीन आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

हेंगली, पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्युशन्स जेव्ही विथ फोटोन आणि ग्रेट वॉल मोटर्स या तीन कंपन्यांनी अनुक्रमे २५० कोटी, १ हजार कोटी आणि ३ हजार ७७० कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यातील तळेगाव टप्पा-२ पुणेमध्ये करण्यासाठी सामंजस्य करार केलेला आहे.

एकूण ५ हजार ०२० कोटी रुपयांच्या या प्रकल्पांसंदर्भात सध्याच्या वातावरणात केंद्र शासनाकडून स्पष्ट धोरण जाहीर होण्याची वाट पाहण्यात येईल, असेही मंत्री देसाई यांनी स्पष्ट केले आहे.

Updated : 22 Jun 2020 3:49 PM GMT
Next Story
Share it
Top