देवेंद्र फडणवीसांना आता तुरुंगात जाण्याची भिती वाटत असेल - संजय राऊत

Update: 2024-04-26 11:12 GMT

राज्यात होत असलेल्या लोकसभा निवडणूकीतील पहिल्या दोन टप्प्यातील लोकसभेच्या १३ जागा पैकी १० जागा महाविकास आघाडी जिंकेल, असा महाविकास आघाडीच्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शुक्रवारी व्यक्त केला आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघात ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना फोन टॅपिंग प्रकरणात भाजप नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आता तुरुंगात जाण्याची भिती वाटत असेल असा दावा त्यांनी केला.

दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई यांनी संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिर्डीच्या साईबाबाचे दर्शन घेतले. यावेळी पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले की, लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या २ दोन टप्प्यातील १० जागा महाविकास आघाडी जिंकणार आहे. त्याचबरोबर राज्याचे विद्यमान मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे लोकसभा निवडणूकीत राजकारणात कुठेही दिसणार नसल्याचेही स्पष्ट केले.

फडणवीस नखशिखांत भ्रष्टाचारी माणूस - संजय राऊत

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीका करताना संजय राऊत म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नखशिखांत भ्रष्टाचारी माणूस असल्याचाही आरोप केला. देवेंद्र फडणवीस केसापासून पायांच्या नखापर्यंत भ्रष्टाचारात बुडालेत. त्यांना आता तुरुंगात जाण्याची भीती वाटत आहे. तुम्ही सत्तेत असताना फोन टॅपिंग केले. त्यामुळे आता मी नाही त्यातली अन् कडी लावा आतली असे कसे चालेल, असे ते म्हणाले.

निवडणूक आयोग ही भाजपचीच शाखा आहे.

केंद्रात सरकार आल्यानंतर इंडिया आघाडी घटनात्मक संस्थांची फेररचना करण्याचे संकेत संजय राऊत यांनी दिले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, निवडणूक आयोग ही भाजपची शाखा आहे. अतिरिक्त शाखा असणाऱ्या आयोगाकडून निष्पक्ष कामाची अपेक्षा करणे आता चुकीचे आहे. आमचे केंद्रात सरकार आल्यानंतर घटनात्मक संस्थांची फेररचना केली जाईल. या संस्था सध्यासारख्या राजकीय हस्तक्षेप न करता काम करतील हे आम्ही पाहू, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.

Tags:    

Similar News