Top
Home > News Update > भारत-चीन वाद: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सल्ला

भारत-चीन वाद: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सल्ला

भारत-चीन वाद: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सल्ला
X

गलवान खोऱ्यामध्ये चीनच्या हल्ल्यामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाल्यानंतर भारत आणि चीन दरम्यान मोठा तणाव निर्माण झालेला आहे. या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण देशाने आता एकजूट दाखवण्याची गरज आहे, असं वक्तव्य माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी केलेले आहे. चीनच्या दबावापुढे आणि धमक्यांना आम्ही घाबरणार नाही आणि आमच्या भौगोलिक अखंडतेबद्दल आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही, असेही मनमोहन सिंग यांनी म्हटले आहे.

आपल्या वक्तव्यांनी चीनच्या षडयंत्राला बळ मिळणार नाही याची खबरदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली पाहिजे, असा सल्लाही मनमोहन सिंग यांनी दिला आहे. सक्षम नेतृत्व आणि उत्तम रणनीती याला भ्रामक प्रचार हा पर्याय होऊ शकत नाही, असा टोलाही मनमोहन सिंग यांनी लगावला आहे. आपल्या जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही याची खबरदारीही सरकारने घेण्याची गरज आहे असेही त्यांनी म्हटले आहे.

"आज आपण इतिहासाच्या एका अत्यंत महत्त्वाच्या वळणावर उभे आहोत. सरकार कोणती पावलं उचलते आणि कोणते निर्णय घेते, याचे मूल्यमापन आपल्या

भविष्यातल पिढ्या करणार आहेत. याची सगळ्यात मोठी जबाबदारी हे देशाचं नेतृत्व करणाऱ्यांवर आहे."

असे मनमोहन सिंग यांनी म्हटले आहे.

Updated : 22 Jun 2020 7:54 AM GMT
Next Story
Share it
Top