मला 2-4 दिवसांत अटक होऊ शकते: मनीष सिसोदिया

Update: 2022-08-20 10:53 GMT

उत्पादन शुल्क प्रकरणात सीबीआयच्या चौकशीला सामोरे जात असलेल्या दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भाजप वर गंभीर आरोप केले. ते म्हणाले...

सीबीआयला माहित आहे आपण कोणताही भ्रष्टाचार केलेला नाही. मात्र, तरीही त्यांना अटक करण्याचे षडयंत्र रचले जात आहे.

सिसोदिया म्हणाले,

यापूर्वी आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना अटक करण्यात आली होती आणि आता त्यांना दोन-चार दिवसांत मला अटक करायची आहे. त्याची सध्या तयारी सुरू आहे. माझ्यासोबत आम आदमी पक्षाच्या आणखी अनेक नेत्यांना अटक होऊ शकते, पण आम्ही केंद्रीय यंत्रणांपुढे झुकणार नाही.

शुक्रवारी सीबीआयने मनीष सिसोदिया यांच्या घरावर 14 तास छापे टाकले आणि त्यानंतर त्यांचा फोन आणि घरातील संगणक जप्त करण्यात आला आहे.

या सर्व कारवाई संदर्भात त्यांच्यावरील सीबीआयची कारवाई म्हणजे अरविंद केजरीवाल यांना रोखण्याचा प्रयत्न आहे. कारण अरविंद केजरीवाल हे देशभरात राष्ट्रीय नेते म्हणून उदयास येत आहेत. अरविंद केजरीवाल यांच्यामुळे भारताचे नाव जगभरात रोशन होत आहे.

अरविंद केजरीवाल यांनी मेक इंडिया नंबर वन मोहीम सुरू करताच, दोन दिवसांनंतर सीबीआयने त्यांच्या घरावर छापा टाकला. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या ना कोणत्या प्रकारे विरोधकांची सरकारे पाडण्याचा विचार करत असतात.

नक्की काय म्हटलंय मनिष सिसोदिया यांनी पाहा...


Full View

Tags:    

Similar News