UPSC परीक्षेत महाराष्ट्राचा टक्का वाढला, 72 उमेदवार यशस्वी

भारतातील सर्वात कठीण असलेल्या UPSC परीक्षेत यावर्षी महाराष्ट्राचा टक्का वाढलाय. यावर्षी युपीएससी च्या अंतिम निवड यादीत महाराष्ट्रातील तब्बल ७२ उमेदवांचा समावेश आहे.

Update: 2023-05-24 13:41 GMT

संयम सातत्य जिद्द आणि चिकाटी हे शब्द फक्त ऐकण्यासाठी चांगले वाटतात. मात्र, प्रत्यक्षात सिद्ध करण्यासाठी, खूप कठीण परिस्थितीतून सामोरे जावे लागते. याचा प्रत्यय केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या 933 विद्यार्थ्यांनी सिद्ध केलंय. आयोगाच्या या परीक्षेमध्ये लाखो विद्यार्थी सहभाग घेतात. मात्र, यावर्षी प्रथमच महाराष्ट्रातील 72 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवून महाराष्ट्राला एक वेगळीच ओळख निर्माण करून दिली आहे. २०२१ मध्ये महाराष्ट्रातून ४७ उमेदवार या परीक्षेत यशस्वी झाले होते. त्यात आता वाढ झाली असून २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत ७२ उमेदवार यशस्वी झाले आहेत.

यूपीएससीच्या पहिल्या शंभर उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या यादीमध्ये महाराष्ट्रातील सात उमेदवार आहेत. यामध्ये कश्मिरा संखे, ही देशात 25 व्या रँक ने उत्तीर्ण झाली आहे. त्यानंतर अंकिता पुवार 28, रुचा कुलकर्णी 54, आदिती वषर्णे 57, दिक्षिता जोशी 58, श्री मालिये 60, वसंत दाभोळकर 76 तर उर्वरीत उत्तीर्ण विद्यार्थ्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत - प्रतिक जरड 112, जान्हवी साठे 127, गौरव कायंडे-पाटील 146, ऋषिकेश शिंदे 183, अर्पिता ठुबे 214, सोहम मनधरे 218, दिव्या गुंडे 265, तेजस अग्निहोत्री 266, अमर राऊत 277, अभिषेक दुधाळ 278, श्रुतिषा पाताडे 281, स्वप्निल पवार 287, हर्ष मंडलिक 310, हिमांषु सामंत 348, अनिकेत हिरडे 349, संकेत गरूड 370, ओमकार गुंडगे 380, परमानंद दराडे 393, मंगेश खिल्लारी 396, रेवैया डोंगरे 410, सागर खरडे 445, पल्लवी सांगळे 452, आशिष पाटील 463, अभिजित पाटील 470, शुभाली परिहार473, शशिकांत नरवडे 493, दीपक यादव 495, रोहित करदम 517, शुभांगी केकण 530, प्रशांत डगळे 535, लोकेश पाटील 552, ऋत्विक कोट्टे 558, प्रतिक्षा कदम 560, मानसी साकोरे 563, सैय्यद मोहमद हुसेन 570, पराग सारस्वत 580, अमित उंदिरवडे 581, श्रुति कोकाटे 608, अनुराग घुगे 624, अक्षय नेरळे 635, प्रतिक कोरडे 638, करण मोरे 648, शिवम बुरघाटे 657, राहुल अतराम 663, गणपत यादव 665, केतकी बोरकर 666, प्रथम प्रधान 670, सुमेध जाधव 687, सागर देठे 691, शिवहर मोरे 693, स्वप्निल डोंगरे 707, दिपक कटवा 717, राजश्री देशमुख 719, महाऋद्र भोर 750, अकिंत पाटील 762, विक्रम अहिरवार 790, विवेक सोनवणे 792, स्वप्निल सैदाने 799, सौरभ अहिरवार 803, गौरव अहिरवार 828, अभिजय पगारे 844, तुषार पवार 861, दयानंद तेंडोलकर 902, वैषाली धांडे 908, निहाल कोरे 922

Tags:    

Similar News