राज्यातील 18 जिल्ह्यात लॉकडाऊन हटवला, कोणते आहेत हे जिल्हे?

Update: 2021-06-03 12:24 GMT

राज्य 15 एप्रिलपासून दुसऱ्या कोरोना लाटेमुळे लॉकडाऊन झालं आहे. मात्र, आता रुग्णांची संख्या कमी झाल्यानं राज्य अनलॉक च्या दिशने वाटचाल करत आहे. या संदर्भात राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज पत्रकार परिषद घेत माहिती दिली.

आज पहिल्या टप्प्यात राज्य सरकारने राज्यातील 18 जिल्ह्यात अनलॉक जाहीर केलं आहे. त्यानुसार या जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनच्या नियमांना शिथिलता दिली आहे.

काय म्हटलंय वड्डेटीवार यांनी

लॉकडाऊन शिथील करण्यासाठी 5 लेव्हल ठरवल्या आहेत. ज्या जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्के आहे आणि ऑक्सिजन बेड 25 टक्क्याच्या आत व्यापलेले असेल, तिथे सर्व गोष्टी सुरु होतील. राज्यातील निर्बंधांच्या बाबतीत 5 टप्पे ठरविण्यात आले असून साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडच्या उपलब्धतेविषयीचे निकष यावरुन हे 5 टप्पे ठरवण्यात आले आहेत.

मुंबईत काय असणार परिस्थिती?

निकषानुसार मुंबईचा पॉझिटिव्हीटी रेट दुसऱ्या टप्प्यात असल्याने मुंबई शहरात लॉकडाऊन शिथील करण्यात येणार नाही.

लोकलचे काय?

मुंबईत रुग्णसंख्या कमी झाली असली तरी अद्यापपर्यंत लोकलबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

कोणते जिल्हे होणार अनलॉक?

परभणी,ठाणे, वर्धा, वाशिम,यवतमाळ, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, औरंगाबाद, भंडारा, गडचिरोली गोंदिया जळगाव, जालना लातूर नागरपूर नांदेड नाशिक या जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात अनलॉक करण्यात येत आहे.

पहिल्या टप्प्यात अनलॉक होणाऱ्या जिल्ह्यांसाठी नियम...

या जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्के असून या जिल्ह्यातील ऑक्सिजन बेड 25 टक्क्यांपेक्षा कमी भरलेले आहेत. त्यामुळं या जिल्ह्यात अनलॉक करण्यात आला आहे.

Tags:    

Similar News