‘त्या’ विमानाची चौकशी करा, पत्रकाराची मागणी

Investigate 'that' plane, demands journalist

Update: 2026-01-28 09:08 GMT

नवी दिल्ली : उपमुख्यमंत्री अजित पवारांचं ज्या VSR Ventures कंपनीच्या विमान अपघातात मृत्यू झाला, त्या विमानाची चौकशी करण्याची मागणी अवेश तिवारी नावाच्या पत्रकारानं केलीय. दरम्यान, सदर कंपनीनं विमान पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा केलाय.

आज सकाळी VSR Ventures या कंपनीच्या LEARJET 45XR या विमानानं अजित पवार हे मुंबईहून बारामतीला प्रवास करत होते. बारामतीत पोहोचल्यानंतर या विमानाचं लँडिंग होतांना भीषण अपघात झाला अन् त्यात अजित पवारांसह ६ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. त्यानंतर Awesh Tiwari @awesh29 या एक्स अकाऊंटवरुन विमानाबद्दल शंका उपस्थित करण्यात आली. अवेश तिवारी हे ज्येष्ठ पत्रकार आहेत. या विमानासंदर्भात ते वृत्तांकन करत असतात. सप्टेंबर २०२३ मध्ये हेच विमान दुर्घटनाग्रस्त झालं होतं. त्यात तीन जण जखमी झाले होते. त्याचा रिपोर्टही तिवारी यांनी एक्सवर पोस्ट केलाय.

या सीरीजमधील अनेक विमानांमध्ये तांत्रिक बिघाड होता, त्यामुळं याच सीरीजच्या विमानांना पुन्हा उड्डाण घेण्यासाठी परवानगी कशी दिली गेली ? ती कुणी दिली ? DGCA काय करत होतं ? असे प्रश्न पत्रकार तिवारींनी उपस्थित केले आहेत.

VSR Ventures ही कंपनी हेच जुनं विमान VVIP यांच्या सेवेत ठेवत आलेली आहे, असा आरोपही पत्रकार तिवारींनी केलाय. दिल्लीच्या महिपालपूर इथं या कंपनीचं कार्यालय आहे. पत्रकार तिवारींनी या कार्यालयातल्या फोनवर कित्येकदा फोन केले, मात्र त्यांना कुठलाही प्रतिसाद मिळालेला नाही. या कंपनीचे मालक कॅप्टन रोहित सिंह यांनाही तिवारींनी फोन केले. त्यामुळं अजित पवारांच्या मृत्यूची योग्य चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही तिवारींनी केलीय.

Tags:    

Similar News