लेबनानमधील महाभयंकर स्फोटांमध्ये 78 ठार, 4 हजार जखमी

Update: 2020-08-05 02:07 GMT

लेबनानची राजधानी बैरुटमध्ये मंगळवारी 2 महाप्रचंड स्फोट झाले आहेत. या स्फोटांच्या आवाजाने संपूर्ण शहर हादरले आहे. संपूर्ण शहरातील इमारतींच्या काचा फुटल्या आहेत. यामध्ये 4 हजार लोक जखमी झाले आहेत. आतापर्यंत 78 जणांचा मृत्यू झाला आहे.

हे दोन स्फोट नेमके कसे झाले त्याची माहिती अजून मिळू शकलेली नाही. तिथल्या वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजता १५ मिनिटांच्या अंतराने हे स्फोट झाले आहेत. या स्फोटांची दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. या दृश्यांमधून या स्फोटांची तीव्रता लक्षात येते. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जाते आहे.

हे ही वाचा...

पंतप्रधानांच्या हस्ते अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन

आधुनिक मंदिरं उभारणारे नेहरु

राम मंदीर भूमीपुजन: नियतीने उगवलेला सूड

संपूर्ण शहरातील वीजपुरवठा ठप्प झाला असल्याने बचावकार्यात अडथळे येत होते. त्यामुळे नेमक्या किती लोकांचा यात मृत्यू झाला आहे ते समजू शकलेले नाही. पोर्टजवळच्या वेअरहाऊसमध्ये आग लागल्याने हे स्फोट झाल्याची चर्चा आहे. पण नेमके कारण अजूनही समोर आलेले नाही. “या संकटाला जे कोणी जबाबदार असतील त्यांना सोडणार नाही, 2014पासून तिथे धोकादायक वेअऱहाऊस आहे, पण तपासात अडथळे येईल असे काही जास्त मी बोलणार नाही”, असे लेबनानचे पंतप्रधान हसन दियाब यांनी सांगितले आहे.

Similar News