Home > News Update > पंतप्रधानांच्या हस्ते अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन

पंतप्रधानांच्या हस्ते अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन

पंतप्रधानांच्या हस्ते अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन
X

अयोध्येत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमीपूजन होत आहे. या सोहळ्याचे दूरदर्शनवर लाईव्ह प्रक्षेपण होणार आहे. कोरोनाच्या संकटामुळे अत्यंत कमी लोकांना या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्थाही तैनात करण्यात आली आहे. बुधवारपासूनच अयोध्येत आंनदोत्सवाला सुरूवात झाली आहे. अनेक ठिकाणी स्वागताचे फलक लावण्यात आले आहेत.

अयोध्येत आल्यानंतर पंतप्रधान मोदी हनुमान गढीला भेट देऊन हनुमानाची पूजा करणार आहेत. रामलल्लाचे दर्शन घेतल्यानंतर भूमिपूजन समारंभ होणार आहे. पंतप्रधानांच्या हस्ते ‘श्रीराम जन्मभूमी मंदिर’ या नावाने टपाल तिकिटाचे प्रकाशनही करण्यात येणार आहे. दरम्यान या मंदिरासाठीच्या लढ्याचे नेतृत्व करणारे लालकृष्ण अडवाणी यांना मात्र कोरोनाच्या संकटामुळे या ठिकाणी जाता येणार नाहीये.

हे ही वाचा...

पंतप्रधानांच्या हस्ते अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन

आधुनिक मंदिरं उभारणारे नेहरु

राम मंदीर भूमीपुजन: नियतीने उगवलेला सूड

तर उमा भारती या शरयूच्या तिरावर बसून हा सोहळा पाहणार आहेत. राम मंदिराच्या भूमिपूजनाचा दिवस माझ्यासह सर्व भारतीयांसाठी भावनिक आणि ऐतिहासिक आहे. हे मंदिर सौहार्दपूर्ण आणि समृद्ध भारताचे प्रतीक ठरेल, असा विश्वास आहे, अशा भावना लालकृष्ण अडवाणी यांनी व्यक्त केल्या आहेत. कोरोनाच्या संकटाममुळे केवळ १७५ जणांन निमंत्रित करण्यात आले आहे.

यामध्ये १३५ साधू संतांचा समावेश आहे. या सोहळ्या दरम्यान कोणालाही अयोध्या शहरात प्रवेश करू दिला जाणार नाहीये, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने मंगळवारी या मंदिराच्या आराखड्याची चित्र प्रसिद्ध केली आहेत. हे मंदिर तीन मजली असून १६१ फूट उंच असेल.

Updated : 5 Aug 2020 1:47 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top