गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची पलटी, पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना दिली स्थगिती

राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या तातडीने करण्यात आलेल्या बदल्यांना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्थगिती दिली.

Update: 2022-04-21 07:38 GMT

राज्य पोलिस दलात कार्यरत असलेल्या भारतीय पोलिस सेवेतील बदल्यांचे आदेश गृहमंत्रालयाने बुधवारी प्रसिद्ध केला होता.मात्र १२ तासांच्या आत आतच यामधील पाच अधिकाऱ्यांच्या बदलीला गृहमंत्रालयाकडून(Home ministry) स्थगीती देण्यात आली आहे.मुंबईसह ठाण्यातील पोलिस अधिक्षक आणि उपायुक्तांसह पाच आयपीएस अधिकाऱ्यांना अप्पर पोलीस आयुक्तीपदी बढती दिली होती. आता सर्वांच्या बढतीला स्थगीती देण्यात आली आहे.

राजेश माने, महेश पाटील,संजय जाधव,पंजाबराव उगले,दत्तात्रय शिंदे यांच्या बदलीला गृहमंत्रालयाकडुन स्थगीती देण्यात आली आहे.पत्रामध्ये गृहमंत्रालयाने पुढील आदेशापर्यंत हि स्थगीती देण्यात आल्याचं स्पष्ट केलं आहे.

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे प्रमुख सहआयुक्त मििलद भारंबे यांच्या खांद्यावर राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी देत विशेष पोलीस महानिरीक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली होती. तर भारंबे यांच्या जागी सुहास वारके हे मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे सहआयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले होते. धडक कारवाई आणि निर्णयांमुळे सध्या राज्यात चर्चेत असलेले नाशिक शहरचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांची राज्य पोलिसांच्या महिला अत्याचार प्रतिबंधक विभागात विशेष पोलीस महानिरीक्षक पदावर नेमणूक करण्यात आली होती. तर व्हीआयपी सुरक्षा विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक जयंत नाईकनवरे यांना बढती देऊन नाशिक शहर पोलीस उपायुक्त पदाची जबाबदारी देण्यात आली होती.


Tags:    

Similar News