अर्थसंकल्पादिवशीच गॅसच्या वाढ; महिन्याच्या सुरुवातीलाच दरवाढीचा भडका

Update: 2024-02-01 03:32 GMT

आज फेब्रुवारी महिन्याचा पहिला दिवस आहे आणि आजच अर्थसंकल्पाच्या आधीच गॅस दरवाढीचा भडका उडाला आहे. एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली असून गॅस कंपन्यांनी आजपासून एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. ही वाढ फक्त १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात करण्यात आली आहे.मात्र घरगुती स्वयंपाकाच्या गॅसच्या सिलिंडरच्या दरात कोणताही बदल केलेला नाही.

गॅस कंपन्यांनी सिलिंडरचे नवीन दर जारी केले आहेत. नवीन दरानुसार, व्यावसायिक गॅसच्या दरात १४ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. जानेवारीत व्यावसायिक गॅसचे दर २ रुपयांनी कमी करण्यात आले होते. मात्र, फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच व्यावसायिक गॅसच्या दरात वाढकरण्यात आली आहे.




 

आज दिल्लीत व्यावसायिक सिलिंडर १७६९.५० रुपये, कोलकातामध्ये १८८७ रुपये, चेन्नईत १७२३.५० रुपये तर मुंबईत व्यावसायिक सिलेंडरचा दर आता १७२३.५० रुपये इतका झाला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. तर घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. मुंबईत सध्या घरगुती गॅस सिलिंडरचा दर ९०२.५० रुपये इतका आहे. तर दिल्लीत ९०३ रुपये, कोलकात्यात ९२९ रुपये, चेन्नईत ९१८.५० रुपये इतका आहे.

दरम्यान, आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सकाळी ११ वाजता लोकसभेत यंदाचा अर्थसंकल्प मांडणार आहे. मात्र, या अर्थसंकल्पापूर्वीच ग्राहकांच्या खिशात भडका उडणार आहे.

Tags:    

Similar News