समीर वानखेडे हाजीर हो....

Update: 2022-02-22 10:06 GMT

अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे यांना मोठा धक्का बसला आहे. समीर वानखेडे यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्यानंतर आता उच्च न्यायालयाने तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी वानखडेंना हजर राहण्याची नोटीस देण्यात आली आहे.

अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) वादग्रस्त समीर वानखेडे यांच्या अडचणी संपताना दिसत नाहीत. नवी मुंबईतील सद्गुरु रेस्टॉरन्ट आणि बार परवाना प्रकरणी ठाणे पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली होती. त्यात या प्रकरणी चौकशीसाठी उद्या २३ फेब्रुवारीला कोपरी पोलिस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले आहे. त्यामुळे उद्या वानखेडे यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.

एनसीबी मुंबईचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्यावर फसवणूक प्रकरणी ठाणे पोलिसांनी कोपरीच्या पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवी मुंबईत वानखेडे यांचा सद्गुरु रेस्टॉरंट आणि बार आहे. त्यांनी खोटी कागदपत्रे सादर करून हा परवाना मिळवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणात त्यांच्याविरुद्ध कोपरी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी वानखेडे यांना समन्स बजावून २३ फेब्रुवारीला पोलुस ठाण्यात हजर राहण्याची सूचना पोलिसांनी दिली आहे. त्यानुसार उद्या वानखेडे यांना कोपरी ठाण्यात हजर रहावे लागणार आहे.

१९९६-९७ मध्ये वय १८ पेक्षा कमी असल्याने करार करण्यास पात्र नसतानाही समीर वानखेडेंनी ठाण्यातील सद्गुरु बार आणि रेस्ट्रॉरंटच्या करारामध्ये पेपरवर आपलं वय लपवलं होतं.याचप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आईने सांगितल्यामुळे मी सही केलं असं निवेदन सादर करत या कारवाई विरोधात समीर वानखडेंनी हायकोर्टात धाव घेतली होती. याचिकेवर तातडीने सुनावणीसाठी आल्यामुळे हायकोर्टाच्या न्यायाधीशांनी संताप व्यक्त करत आभाळ कोसळणार नाही असं म्हणत सुनावणी आठवडाभर लांबवणीवर टाकली आहे.

Tags:    

Similar News