नाशिक-पुणे महामार्गावर एसटी व ट्रकचा भीषण अपघात, एकाचा मृत्यू

Update: 2023-08-13 05:31 GMT

पुणे-नाशिक महामार्गावर नाशिक ते पुणे जाणारी लेनवर मल्हारवाडी शिवारात 19 मैल येथे एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला असून एकजण जागीच ठार झाला आहे. पंचर झालेली बस ही महामार्गावर उभी असताना पाठीमागून येणारे ट्रकने बसला धडक दिली. त्यावेळी एसटी चालक गाडी खाली जॅक लावत होते. त्यामुळे गाडीखाली गुंतून गंभीर जखमी झाले. व त्यांना उपचारासाठी दुसऱ्या एसटी बस मधून दवाखान्यात नेले असता त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे. तसेच ट्रक चालकाला खाजगी ॲम्बुलन्सने सोनवणे हॉस्पिटल आळेफाटा येथे दाखल केले आहे. सदर अपघातग्रस्त वाहन क्रेनच्या साहाय्याने रस्त्याच्या बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.

Tags:    

Similar News