फेसबुकला बजरंग दलाची भीती, वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्ताने खळबळ

Update: 2020-12-14 11:42 GMT

फेसबुकने आपल्या नियमांनुसार कट्टर हिंदुत्ववादी संघटना बजरंग दलावर कारवाई केली नाही, कारण कंपनीला आपल्या भारतातील व्यवसाय आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची काळजी होती, असे धक्कादायक वृत्त द वॉलस्ट्रीट जर्नलने दिले आहे. भाजप नेत्याच्या धार्मिक द्वेष पसरवणाऱ्या पोस्ट काढल्या तर केंद्रातील मोदी सरकार नाराज होईल आणि कंपनीच्या व्यवसायावर त्याचा परिणाम होईल अशी भीती फेसबुकला वाटत होती, असे वृत्त वॉल स्ट्रीट जर्नलने यापूर्वी दिले होते.

त्यानंतर आता बजरंग दल अल्पसंख्याकांविरुद्ध द्वेष पसरवणाऱ्या पोस्ट करत असून त्यांच्यावर कारवाई करावी अशी शिफारस फेसबुकच्या सुरक्षा समितीने केली होती. पण फेसबुक'ने राजकीय आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बजरंग दलावर कारवाई केली नाही अशा स्वरूपाचे वृत्त वॉल स्ट्रीट जर्नल दिलेला आहे. बजरंग दलावर कारवाई केली तर कंपनीच्या भारतातील व्यवसायावर परिणाम होऊ शकतो आणि कंपनीच्या कर्मचाऱ्यांची सुरक्षा धोक्यात येऊ शकते असे फेसबुकला वाटलं असा दावा देखील या वृत्तामध्ये करण्यात आलेला आहे.

या वृत्ताचा संदर्भ देत राहुल गांधी यांनी टीका करणारे ट्विट केले आहे. "पुन्हा एकदा फेसबुकचे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संबंध उघड झाले आहेत."

Tags:    

Similar News