Facebook ने पेज चं Like बटण हटवलं, काय असतील नवीन बदल...

Update: 2021-01-08 11:18 GMT

फेसबूक ने नवीन वर्षात काही बदल केले आहेत. फेसबुकने नुकतेच व्हॉट्सअ‍ॅपच्या पॉलिसीमध्ये बदल केले होते. त्यानंतर फेसबुकने पब्लिक पेजमधून 'Like' बटण काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

फेसबूक ने पब्लिक फिगर असलेल्या व्यक्ती त्यामध्ये कलाकार, खेळाडू, नेते तसंच विविध संस्थेची पेज ला पुन्हा एकदा डिझाइन केलं आहे. त्यामध्ये त्यांनी पेजचं लाइक बटण हटवलं आहे.

त्यामुळं फेसबुकवर असलेल्या लाइक आणि फॉलो पर्याया पैकी फक्त फॉलोअर्स हा पर्याय राहील. लाईक दिसणार नाहीत. मात्र, पोस्ट साठी लाइक, कमेंट आणि शेअर ही बटण कायम राहणार आहेत.

Tags:    

Similar News