#FabIndia च्या जाहीरातीवरुन धार्मिक भावना दुखावल्याचा वादाला पुन्हा फोडणी

Update: 2021-10-19 08:33 GMT

सणासुदीच्या मुहुर्तावर कोर्पोरेट कंपन्यांनी केलेल्या जाहीरातीमुळे धार्मिक भावना दुखावल्याचं प्रकरण यंदाही दिवाळीच्या पार्श्वभुमीवर पुढं आलं आहे. यावेळी हा फटका वस्त्रोद्योगाच्या क्षेत्रात आघाडीवर असलेल्या Fabindia ला बसला आहे.


आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभुमीवर अनेक कंपन्यांनी प्रोमोशनल जाहीराती प्रसिध्द केल्या आहेत. वस्त्रोद्योगाच्या क्षेत्रात आघाडीवर असलेल्या

फॅबइंडियानं दिवाळीनिमित्त जाहीरात करताना दिवाळीला ` जश्न-ए-रिवाज` असं म्हटलं होतं.

या ट्विटनंतर उजव्या विचारसरणीच्या संघटनांकडून मोठ्या प्रमाणात ट्रोलिंग करण्यात आलं.भाजपचे बंगलोरचे खासदार तेजस्वी सुर्या यांनी याबाबत ट्विट करुन पारंपारिक हिंदू पोशाख नसलेल्या मॉडेल्सचे चित्रण करून हिंदू सणांच्या जाणीवपूर्वक अब्राह्ममणीकरणाचा हा प्रयत्न आहे. याची किंमत #Fabindia मोजावी लागेल असं त्यांनी म्हटलं आहे.

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोल झाल्यानंतर दिवाळीसाठी #Fabindia नं नवीन कलेक्शनला प्रोत्साहन देणारे ट्विट काढून टाकले आहे. या ब्रँडवर हिंदू दिवाळीच्या सणाला "अपमानित" करण्याचा आणि त्याला जश्न-ए-रिवाज म्हणण्याचा आरोप होता. अनेकांनी हिंदू सणात धर्मनिरपेक्षता आणि मुस्लिम विचारधारा अनावश्यकपणे आणल्याबद्दल ब्रँडची निंदा करत #Fabindia वर बंदी घालून त्यांच्या उत्पादनांवर बंदीची मागणी केली होती.

मोठ्या प्रमाणात ट्रोलिंग झाल्यानंतर फॅब इंडीयानं सदर जाहीरात मागे घेतली आहे. यापूर्वीच्या काळातही तनिष्क या दागिने उत्पादक कंपनीवर अशाच पध्दतीने ट्रोलिंग केल्यानंतर जाहीरात मागे घेण्याची वेळ आली होती.

Tags:    

Similar News