Rashmi shukla|राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला निवृत्त; सदानंद दाते नवे डीजीपी
राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आज निवृत्त झाल्या आहेत. त्यांच्या निवृत्तीनंतर राज्याच्या पोलीस महासंचालकपदी ज्येष्ठ आयपीएस अधिकारी सदानंद दाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून नव्या डीजीपी पदाबाबत चर्चा सुरू होती.
मुंबईतील नायगाव येथील पोलीस मैदानात पार पडलेल्या कार्यक्रमात सदानंद दाते यांनी पदभार स्वीकारला. २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात शौर्य गाजवणारे अधिकारी म्हणून सदानंद दाते यांना ओळखले जातात. ते राज्याचे ४८ वे पोलीस महासंचालक असून त्यांना दोन वर्षांचा कार्यकाळ मिळणार आहे.