मुंबईच्या महापौरपदासाठी ठाकरे बंधुंना पसंती !

Update: 2026-01-05 11:22 GMT

मुंबई : आशिया खंडातली सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून मुंबई महापालिकेची ओळख आहे. त्यामुळं साहजिकच या महापालिकेत सत्ता काबिज करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये चढाओढ असते. बंडखोरीपूर्वी इथं शिवसेनेची सत्ता होती. मात्र, आता दोन्ही ठाकरे बंधुंची युती झालीय. तर दुसरीकडे भाजप आणि शिवसेना (शिंदे) यांनीही मुंबई महापालिकेसाठी कंबर कसलीय. अशा परिस्थितीतच मुंबईचा महापौर म्हणून लोकांनी कुणाला पसंती दिलीय, याचा मॅक्स महाराष्ट्रनं एका पोलद्वारे अंदाज घेतलाय.

आगामी १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीत महापौर कोण होणार, यावरून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. युट्यूबवरील 'Max Maharashtra' च्या कम्युनिटी पोलमध्ये उद्धव ठाकरे गटाची शिवसेना (UBT) आणि राज ठाकरे यांच्या मनसेच्या युतीला तब्बल ८१ टक्के मतदारांनी पाठिंबा दिला आहे. हा पोल १७ हजारांहून अधिक मतांसह पार पडला असून, युतीला सर्वाधिक पसंती मिळाली आहे.

पोलचे निकाल खालीलप्रमाणे :

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) + मनसे : ८१%

काँग्रेस + वंचित : १२%

भाजपा + शिवसेना (शिंदे गट) : ८%




 http://youtube.com/post/UgkxBwlrvDCkjVcItxESucXxvEw6BH6mCnal?si=kFNZYTKq8PbebP1D


या पोलनुसार, ठाकरे बंधूंच्या युतीला मुंबईकरांचा मोठा कौल मिळत असल्याचे दिसते. विशेष म्हणजे, महायुतीला (भाजपा-शिंदे सेना) फक्त ८% मते मिळाली आहेत. मागील काही दिवसांतील X (ट्विटर) वरील पोलमध्येही शिवसेना (UBT) + मनसेला ७३% पाठिंबा मिळाला होता, तर भाजपाला २०% आणि शिंदे सेनेला ५% मते होती.




https://x.com/MaxMaharashtra/status/2006331840949629061?s=20


वास्तविक निवडणुकीतशिवसेना (UBT)-मनसे युती महायुतीला कडवी टक्कर देणार असल्याचे हे पोल सूचित करतात. मात्र, हे ऑनलाइन पोल असल्याने ते सर्व मतदारांचे प्रतिनिधित्व करत नाहीत, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. BMC निवडणुकीत २२७ जागांसाठी चुरस असून, मतमोजणी १६ जानेवारीला होईल. ठाकरे बंधूंची युती आणि महायुती यांच्यात थेट लढत होणार आहे.

Tags:    

Similar News