चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी

Update: 2021-07-22 10:01 GMT

शिराळा // सांगली जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होऊन गेल्या २४ तासात १८५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जोरदार पावसामुळे चांदोली धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली असून धरणातून विसर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा धरण प्रशासनामार्फत देण्यात आला आहे.

चांदोली धरण परिसरामध्ये गेल्या आठ दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. मंगळवारी ६८ मिलिमीटर तर बुधवारी २४ तासात १८५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे धरण ८१.७२ टक्के भरले असून धरणात २८.१२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

* २४ हजार ४४१ क्युझसेक्सच धरणात पाण्याची आवक*

चांदोली धरणाची पाणी पातळी ६२०.२५ मीटर झाली आहे. तर आज झालेल्या जोरदार पावसाने धरणाच्या पाण्याने सांडवा पातळी गाठली आहे. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येणार आहे.पावसाचा अंदाज घेऊन धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी हा विसर्ग कमी-अधिक प्रमाणात केला जाईल अशी माहीती देण्यात आली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहावे असा सुचना देखील देण्यात आल्या आहे.

Tags:    

Similar News