खबरदार! नाकाबंदीत लाठी घेऊन उभे राहिलात तर..; औरंगाबाद पोलीस आयुक्तांचे आदेश

Update: 2021-07-09 06:31 GMT

औरंगाबाद: नाकेबंदी दरम्यान पोलिसांनी मारहाण केली, वाद घातला असे अनेक आरोप अनेकदा सर्वसामन्यांकडून होतात. तर काही ठिकाणी पोलिसांकडून मारहाण करण्यात आल्याच्या घटना सुद्धा समोर आल्या आहेत. अशीच घटना औरंगाबादच्या मुकंदवाडी भागात घडली होती. त्यांनतर संतापलेल्या पोलीस आयुक्तांनी, यापुढे नाकाबंदीत लाठी घेऊन उभे राहिल्यास चौकशीला सामोरे जावे लागेल, असा संदेशच ठाणेदारांना दिला आहे.

औरंगाबाद येथील मुकंदवाडी परिसरात दुचाकीस्वार रमेश काळे या तरुणाला नाकेबंदीदरम्यान पोलिसांकडून बेदम मारहाण करण्यात आली होती. याच्या बातम्या माध्यमांमध्ये येताच पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी दखल घेतली असून, मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे.

तसेच यापुढे आता नाकेबंदी दरम्यान एकही पोलीस अधिकारी,कर्मचाऱ्यांने लाठी घेऊन उभे राहयचे नाही,सर्वांनी आपल्या लाठ्या पेंडॉलमध्ये ठेवायच्या,अशा सूचना दिल्या आहेत. तसेच कुणाकडेही लाठी दिसली तर संबधित इंचार्ज अधिकाऱ्याला जवाबदार धरून विभागीय चौकशी केली जाईल,असा सज्जड दम भरला आहे.

Tags:    

Similar News