पंकजा मुंडेंना उशिरा जाग आली: धनंजय मुंडे

Update: 2021-05-01 06:04 GMT

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. बीड जिल्ह्यामध्ये माजी पालकमंत्र्यांनी अधिक लक्ष देणं गरजेचं होतं. पण उशिरा का होईना? त्यांना कोविड परिस्थितीवर जाग आलीय, आता उशिरा का जाग आली असं म्हणता येत नाही. त्यांनी ज्या सूचना केल्या त्याची अधिक काळजी घेऊ, माञ, आपणही केंद्रामध्ये सत्तेत आहात. त्यामुळे बीड जिल्ह्याला अधिक लसी कशा मिळतील यासाठी त्यांना जाग येणं आवश्यक असल्याचं धनंजय मुंडे म्हणाले आहेत.

दरम्यान पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर ट्विटवरून टीका केली होती.

"राज्याच्या भल्यासाठी PM,जिल्ह्याच्या CM आणि पवार साहेबांना ही पत्र लिहीन दखल ही घेतली जाईल! तुम्ही त्यांनी दिलेल्या संधीचा तरी सन्मान करा. तुम्ही बीडमध्ये दमडीही आणली नाही. विमा,विकास निधी,अनुदान काही नाही, माफिया मात्र आणले. जुन्या निधीचे काम तरी करा, उद्घाटन करा हक्क तुम्हाला आहेच भाऊ!" असं म्हणत ट्वीटरवरुन निशाणा साधला होता. तसंच पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार थांबवण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लेखी पत्र देऊन धनंजय मुंडे यांच्या कारभाराचीच तक्रार केली होती.

Tags:    

Similar News