फोन टॅपिंग प्रकरणावरुन देवेंद्र फडणवीसांची चौकशी, पोलिस चौकशीसाठी फडणवीसांच्या घरी दाखल

Update: 2022-03-13 07:21 GMT

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी नोटीस पाठवुन फोन टॅपिंग प्रकरणी रविवारी बीकेसी सायबर पोलिस ठाण्यात जबाबासाठी बोलावले होते. मात्र त्यानंतर काही तासातच तुम्ही येऊ नका, आम्हीच तुमच्या सागर बंगल्यावर येतो, असा निरोप देवेंद्र फडणवीस यांना आला, आता सकाळी पोलिस चौकशीसाठी फडणवीसांच्या घरी पोडचले आहेत.

मुंबई पोलिसांनी अशी भूमिका का बदलली याबाबत तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. फडणवीस पोलिस ठाण्यात पोहचले तर कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा पोलिसांचा अंदाज असू शकतो.विधीमंडळ अधिवेशन सुरु आहे.फडणवीस यांना ठाण्यात बोलावले तर तीव्र पडसाद अधिवेशनात उमटू शकतील याचा अंदाज घेऊन महाविकास आघाडी सरकारने राजकीय़ संघर्ष टाळला, असेही म्हटले जात आहे.

मी विधानसभेचा विरोधी पक्षनेता आहे. आणि पोलिस माझ्याकडील माहितीचा स्त्रोत विचारु शकत नाहीत. मी चौकशीला पूर्ण सहकार्य करणार आहे.योग्य उत्तर देणार आहे. मी सरकारच्या आशिर्वादाने विरोधी पक्षातील नेत्यांविरुद्ध झालेल्या षडयंत्राचा अलिकडे पर्दाफाश केल्याने हि नोटीस पाठवली असावी. फोन टॅपिंग प्रकरणी मी माहिती फोडली नव्हती, सध्याच्या एका मंत्र्यानीच ती फोडली होती आणि त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.

दरम्यान फडणवीसांना आलेल्या नोटिशीविरोधात भाजप आक्रमक झाली आहे. आज राज्यभर मुंबई पोलिसांच्या नोटिशीची होळी भाजपतर्फे करण्यात आली.त्यावरच आता संजय राऊतांनी ट्विटरच्या माध्यमातुन भाजपावर टिका केली आहे,

कमाल आहे!काही लोक व काही राजकीय पक्ष स्वता:ला कायद्यापेक्षा मोठे का समजतआहेत? महाराष्ट्रात अनेक मंत्री आणि लोकप्रतिनधींनीना राजकीय सुडा पोटी केंद्रीय तपास यंत्रणांनी चौकशीला बोलावले व ते हजर झाले.. लोकशाहीत विशेष अधिकार कोणालाच नसतो. कायद्यापुढे सगळे समान आहेत. मग हा तमाशा का? असे संजय राऊतांनी ट्विट केले आहे.

Tags:    

Similar News