Curly Tales Controversy : मोदी सरकारच्या प्रचारासाठी Influencer Kamiya Jani ने घेतले ६ कोटी
Curly Tales कर्ली टेल्स या YOUTUBE युट्युब चॅनेल चालविणाऱ्या कामिया जानी Kamiya Jani हिने केंद्र सरकारच्या प्रचारासाठी तब्बल ६ कोटी रुपये घेतल्याचा दावा, News Laundry न्यूज लॉन्ड्री या स्वतंत्र माध्यमानं केलाय. वंदे भारत, तेजस, विमानतळं आणि रेल्वे स्टेशनन्सच्या विकासासंदर्भातील प्रचारासाठी करदात्यांच्या पैशातून कामियाला हे पैसे देण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय. Vande Bharat trains, Tejas trains, airports, and railway station development
न्यूजलॉन्ड्रीच्या रिपोर्टनुसार, मार्च २०२४ मध्ये Doordarshan दूरदर्शन नॅशनल या सरकारी वाहिनीवर 'इंडिया इन मोशन' India in Motion नावाची डॉक्युमेंटरी मालिका प्रसारित झाली होती. ही मालिका MODI मोदी सरकारच्या रस्ते, रेल्वे आणि विमानतळ क्षेत्रातील कामगिरीवर आधारित होती. या मालिकेचं अँकरिंग ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर कामिया जानी हिने केलं होतं. या मालिकेसाठी प्रसार भारतीनं सुमारे ६ कोटी ९ लाख रुपयांचा करार कामियासोबत केला होता. हा सर्व पैसा सामान्य करदात्यांच्या पैशातून करण्यात आल्याचा दावा न्यूज लॉन्ड्रीनं केलाय.
कोट्यवधी रुपयांच्या करारासहित या मालिकेवर दूरदर्शनची म्हणजेच सरकारची मालकी होती. मात्र, त्यानंतर काही तासांमध्येच ही मालिका कर्ली टेल्स आणि इतर खाजगी यूट्यूब चॅनेलवर प्रसारित करण्यात आली. म्हणजेच सरकारी पैशातून निर्मिती केलेला कंटेंट हा खाजगी युट्युब चॅनेलवर प्रसारित करण्यात आला ज्याचा थेट फायदा हा त्या खाजगी युट्युब चॅनेल्सला होतोय तो मॉनिटायझेशनच्या माध्यमातून. त्यामुळं कर्ली टेल्स आणि प्रसारभारतीमध्ये झालेल्या नियमांचं उल्लंघन झाल्याचा आरोप होतोय. तर दुसरीकडे प्रसारभारतीनं Prasar Bharati या प्रकरणात सेटलमेंट केल्याचं न्यूज लॉन्ड्रीचं म्हणणं आहे.
या कामाचं कंत्राट हे पहिल्यांदा सॉफ्टलाईन स्टुडिओ सर्विसेस लिमिटेडला देण्यात आलं होतं. त्यानंतर या मालिकेच्या निर्मितीचं काम हे कामिया जानीचा नवरा संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या फोर्क मीडिया कंपनीला देण्यात आलं. यातही मूळ कंत्राटातील नियमांना बगल दिल्याचा आरोप केला जातोय. काम्या जानीच्या फोर्क मिडीया कंपनीनं निर्मिती केलेल्या मालिकेचा भाग नंतर माशाबेल इंडिया या युट्यूब चॅनेलवरही प्रसारित करण्यात आले. इथंही नियमांचा भंग झाल्याचा आरोप होतोय.
सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे, मालिकेची निर्मिती झाल्यानंतर या कंत्राटाच्या कागदपत्रांवर सह्या करण्यात आल्या.
न्यूज लॉन्ड्रीच्या रिपोर्टमध्ये ६० सेकंदाच्या एकेका रीलसाठी २० लाख रुपये कामिया जानीला देण्यात आल्याचा उल्लेख मात्र नाहीये. मात्र, या एकूण कराराची रक्कम ६ कोटींपेक्षा अधिक आहे. आधी सेलिब्रेटी किंवा न्यूज अँकर्स अशा पद्धतीनं सरकारी जाहिराती करत होते. त्यात आता सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना सरकारी प्रचारासाठी मोठ्या प्रमाणात पैसे दिले जात आहेत आणि ते देखील करदात्यांच्या पैशातून, असा थेट आरोपही न्यूज लॉन्ड्रीच्या रिपोर्टमध्ये करण्यात आलाय.
न्यूज लॉन्ड्रीनं यासंदर्भातील आपल्या रिपोर्टमध्ये या संपूर्ण प्रकरणावर सखोल लिखाण केलंय. प्रसार भारतीनं कशा पद्धतीनं नियमांना बगल दिली आणि प्रचारासाठी इन्फ्लुएन्सर कंटेट तयार करण्यासाठी सार्वजनिक पैशांच्या वापराबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. सामान्य नागरिकांनी कररुपानं सरकार तिजोरीत टाकलेले पैसे कशापद्धतीनं खर्च केले जात आहेत, याकडे लक्ष वेधलंय.